‘प्रधानमंत्री घरकुल आवास योजने’मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात अव्वल

‘प्रधानमंत्री घरकुल आवास योजने’मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात अव्वल

प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याने उत्कृष्ठ कामगिरी करत राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका दिपाली पाटील यांनी ही माहिती दिली. केंद्र व राज्य शासना मार्फत २०१६-१७ पासून प्रधानमंत्री घरकुल आवास योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत १ लाख २० हजार रुपयांचे अनुदान घरकुल बांधणीसाठी दिले जाते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही योजना राबवताना योजनेतील ब यादीतील ३ हजार ९४४ कुटूंबापैकी ३ हजार ६५४ कुटुंबाच्या घरकुल यादीला ऑनलाइन मंजुरी देण्यात आली ९१.५० टक्के यादी मंजुरीचे काम झाले मंजूर यादीतील ३ हजार ६१८ कुटूंबाना १५ हजार रुपये प्रमाणे प्रत्येकाला पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत २ हजार ६६५ कुटूंबानी घरकुले बांधून पूर्ण केली आहेत ६६.७२ टक्के काम झाले आहे. तर मागील वर्षाची सुद्धा २ हजार ८१० पैकी २ हजार ६१० घरकुले पूर्ण झाली आहेत.

घरकुल आवास योजनेंतर्गत १०० टक्के ग्रामसभा ठराव अपलोड करण्यात आले आहेत. ९५.७५ टक्के कुटूंबाचे आधार सिडिंग करण्यात आले आहेत. प्रत्येक टप्प्यात वेळो वेळो लोकांचे प्रस्ताव मागवून त्याची पूर्तता करणे, उद्दिष्ट पूर्ण करण्याचे काम वेळच्या वेळी केले आहे. त्यामुळे ३१ मार्चला प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंमलबजावणी बाबत शासनाने जाहीर केलेल्या रँक मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याने ८६.३२ गुण मिळवून राज्यात पहिला जिल्हा आला आहे. तर देशात ९३ वा क्रमांक आहे. ग्रामपंचायत स्तरापासून जिल्हा स्तरापर्यतच्या सर्व यंत्रणांनी चागले काम केल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. ग्रामसेवक, गटविकास अधिकारी यांनीही चागली काम केले आहे, अशी माहिती प्रकल्प संचालिका दीपाली पाटील यांनी दिली आहे

First Published on: April 1, 2021 7:45 PM
Exit mobile version