माथेरानमध्ये शिवसेनेचे १० नगरसेवक भाजपात

माथेरानमध्ये शिवसेनेचे १० नगरसेवक भाजपात

जळगावच्या मुक्ताईनगर पालिकेतील भाजपच्या नगरसेवकांना आपल्याकडे घेण्याच्या शिवसेनेच्या कृतीची परतफेड करत भाजपने माथेरान नगरपालिकेत करत सेनेच्या १० नगरसेवकांना फोडत आपल्याकडे घेतले आहे. येथील नगर पालिकेच्या निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक असताना सत्ताधारी शिवसेनेच्या 17 नगरसेवकांपैकी 10 नगरसेवकांनी भारतीय जनता पार्टीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपास्थितीत गुरुवारी थेट कोल्हापुरात जाऊन प्रवेश केला.

शिवसेनेच्या काही पदाधिकार्‍यांचाही पक्षांतर करणार्‍यांमध्ये समावेश आहे. अचानक आलेल्या या राजकीय चक्रीवादळाने प्रचंड खळबळ माजली असून, पक्षाच्या बालेकिल्ल्यातील ही पडझड कशी थांबणार, याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, दोन वर्षांपासून उपनगराध्यक्षपदावरून सुरू झालेली धुसफूस आणि विकास कामांतील ठेकेदारीवरून चाललेले तू तू मै मै हे या पक्षांतरामागील प्रमुख कारण असल्याचे बोलले जात आहे. या पक्षांतराची गंभीर दखल शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी घेतली असून, त्यांनी तातडीने

2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत थेट जनतेमधून शिवसेनेला नगराध्यक्षपद मिळाले. तसेच 14 नगरसेवक आणि दोन स्वीकृत नगरसेवकही शिवसेनेचे असल्याने पालिकेत पक्षाची एकहाती सत्ता होती. मात्र अंतर्गत गटातटाच्या राजकारणामुळे काही नगरसेवकांनी शिवबंधन सोडून थेट भाजपचे कमळ हाती घेत येऊ घातलेल्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, उप शहरप्रमुख कुलदीप जाधव, शिवसेना शहर संघटक प्रवीण सकपाळ, माजी नगरसेवक प्रदीप घावरे, डी ग्रुपचे अध्यक्ष किरण चौधरी, नगरसेवक संदीप कदम, युवा शहरप्रमुख तथा नगरसेवक राकेश चौधरी, स्वीकृत नगरसेवक चंद्रकांत जाधव, रुपाली आखाडे, प्रियांका कदम, सोनम दाभेकर, सुषमा जाधव, प्रतिभा घावरे, ज्योती सोनावळे यांचा प्रवेशकर्त्यांमध्ये समावेश आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीची बैठक बोलावली असून, गटनेते तथा नगरसेवक प्रसाद सावंत यांच्या गटासोबत नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, नगरसेवक राजेंद्र शिंदे, शकील पटेल, नरेश काळे, किर्ती मोरे, स्वीकृत नगरसेविका ऋतुजा प्रधान, तसेच महाविकास आघाडी सरकारमधील मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजय सावंत यांच्यासह पक्षाच्या नगरसेविका वर्षा रॉड्रिग्ज, नजमा शारवान, माजी नगराध्यक्ष विवेक चौधरी, माजी उपनगराध्यक्ष राजेश दळवी आदी येथून अज्ञातस्थळी रवाना झाले.

शिवसेनेतील दोन गटांत दोन वर्षांपासूनच धुसफूस सुरू असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष, आमदार, खासदार यांना देखील होती. यासंदर्भात दोन बैठका देखील झाल्या होत्या. मात्र वाद मिटविण्यात पक्षश्रेष्ठी सपशेल अपयशी ठरले होते. या फोडाफोडीच्या राजकारणात शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी यांच्या गटातील सदस्य, तसेच कुटुंबातील नगरसेवक तथा युवा शहर प्रमुख असलेल्या राकेश चौधरी, त्याचबरोबर उपनगराध्यक्ष आकाश चौधरी यांनी बंडखोरी केल्याने चंद्रकांत चौधरी यांना मोठा धक्का मानला जात आहे. या सर्व प्रकरणाला येथे सुरू असलेल्या करोडो रुपयांच्या विकास कामांच्या ठेकेदारीतील चढाओढीची पार्श्वभूमी असल्याचेही बोलले जाते.

असे आहे बलाबल..
नगराध्यक्ष (शिवसेना)
नगरसेवक ः शिवसेना ७
राष्ट्रवादी काँग्रेस २
काँग्रेस १
भाजपात गेलेले बंडखोर – 10

First Published on: May 27, 2021 8:32 PM
Exit mobile version