माझ्यावर आरोप करणाऱ्यांना माझ्यामुळे भाकरी मिळते; ठाकरेंचा विरोधकांना टोला

माझ्यावर आरोप करणाऱ्यांना माझ्यामुळे भाकरी मिळते; ठाकरेंचा विरोधकांना टोला

महाड : महाड येथील चांदे क्रिडांगणावर शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जाहीर सभा आणि पक्षप्रवेश सोहळा पार पडत आहे. यावेळी बोलताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) म्हणाले की, काही जणांना तर माझ्यावर टीका केल्याशिवाय घसाखाली घास उतरत नाही आहे. मला असं वाटायला लागले आहे की, माझ्यावर टीका केल्याशिवाय त्यांना रोज भाकर मिळत नाही. मला एक समाधान आहे की, माझ्यामुळे माझ्यावर आरोप करणाऱ्यांना भाकरी मिळते, दोन घास मिळतात हेही नसे थोडके.

उद्धव ठाकरे म्हणाले की, अनेकांना असे वाटले होते की, शिवसेना संपवली पाहिजे असे काही लोकांना वाटते आहे. काही लोकांचा असा गैरसमज होता की, ते स्वत: म्हणजे शिवसेना. तुम्ही निवडून दिलेली माणसे, मोठी केलेली माणसे निघून गेली. पण ज्यांनी मोठी केली ती सर्व माणसं दुप्पट नाही दसपट नाही तर सहस्त्रपटीने माझ्यासोबत आलेली आहेत.
काही जणांना तर माझ्यावर टीका केल्याशिवाय घसाखाली घास उतरत नाही आहे. मला असं वाटायला लागले आहे की, माझ्यावर टीका केल्याशिवाय त्यांना रोज भाकर मिळत नाही. मला एक समाधान आहे की, माझ्यामुळे माझ्यावर आरोप करणाऱ्यांना भाकरी मिळते, दोन घास मिळतात हेही नसे थोडके, असा टोला उद्धव ठाकरेंनी विरोधकांना लगावला.

यावेळी त्यांनी बोलताना म्हटले की, आज जगताप कुटुंब शिवसेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्या कुटुंबात आलेल्या आहेत. मी स्नेहल जगताप, त्यांच्या काकाचं आणि सर्व कुटुंबाचं मी शिवसेनेत स्वागत करतो. खरं म्हणजे मी अस म्हणत होतो की, मातोश्रीवर आपण प्रवेशाचा कार्यक्रम घेऊया आणि नंतर महाडमध्ये जाहीर सभा घेऊ, पण ऐकतील ते जगताप कुटुंब कुठले. त्यांनी हट्टच धरला की, या ऐतिहासिक मैदानात सर्वांच्या साक्षीने आम्ही प्रवेश घेणार आणि म्हणून मी आज मुद्दामहून आलो. स्नेहल आणि जगताप कुटुंब काँग्रेसमधून आल्यामुळे काही लोकांच्या भुवया उंचावल्या, तर काही लोकांच्या पोटात गोळा की, आता पुढच्या निवडणुकीत डिपॉजिट 1 लाख टक्के जप्त. मग आता कसं होणार. काँग्रेसमधून शिवसेनेत आले तर शिवसैनिकांचं काय होणार. आमच्यातला गद्दार घेऊन भाजपावाल्यांनी डोक्यावर चढवला. तस आम्ही काही करणार नाही. त्यांना काही न देता त्या आपल्याकडे आल्या आहेत. आज माझ्याकडे सत्ता नाही. पाठीवरती वार तर आपल्याच लोकांनी केले. भाजपनं एवढा नीच डाव केला की, चिन्ह, पक्ष दोन्हीही चोरले. मी आज तुमच्यापुढे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव घेऊन आलो आहे, बाकी काही नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

 

First Published on: May 6, 2023 7:58 PM
Exit mobile version