हैदराबाद ओपन बॅडमिंटन स्पर्धा : भारताचा समीर वर्मा अंतिम फेरीत दाखल

हैदराबाद ओपन बॅडमिंटन स्पर्धा : भारताचा समीर वर्मा अंतिम फेरीत दाखल

समीर वर्मा

भारतातील हैदराबाद येथे ‘हैदराबाद ओपन बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा’ सुरू असून भारताच्या समीर वर्माने उपांत्य फेरीत भारताच्याच आर. एम. व्ही. गुरूसाईदत्तला नमवत अंतिम फेरी गाठली आहे. समीरने गुरूसाईदत्तला २-१ च्या फरकाने नमवत सामन्यात विजय मिळवला आहे. तब्बल ४ लाखाचे बक्षिस असणाऱ्या या स्पर्धेत समीर अंतिम सामन्यात मलेशियाच्या सूंग जू वेनविरुद्ध लढणार आहे. सूंग जू हा उपांत्य फेरीच्या सामन्यात इंडोनेशियाच्या फिरमान अब्दुल खोलिकला २१-१७, २१-१४ गुणांनी नमवून अंतिम फेरीत दाखल झाला आहे.

असा झाला सामना

समीर आणि गुरूसाईदत्त यांच्यातील सामना तब्बल तीन राउंड रंगला. चुरशीच्या झालेल्या सामन्यात पहिला सेट गुरूसाईदत्तने १६-२१ च्या फरकाने आपल्या नावे करत सामन्यात १-० ची आघाडी मिळवली. मात्र नंतर समीरने आपला खेळ उचांवत दुसरा सेट २१-१५ च्या फरकाने जिंकत सामन्यात १-१ ची बरोबरी मिळवली . त्यानंतर तिसरा सेट २१-११ च्या फरकाने जिंकत समीरने सामना आपल्या नावे करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे.

हैदराबाद ओपनमध्ये तब्बल ‘५४ लाखांची’ बक्षिस

हैदराबाद ओपन ही टेनिस विश्वातील एक अत्यंत मानाची स्पर्धा असून त्यात तब्बल ७५ हजार डॉलर्सची बक्षिस वाटली जाणार आहेत. भारतीय चलनानुसार ५४ लाख इतकी बक्षिसांची रक्कम आहे. यात एकेरी स्पर्धी जिंकणार्याला ४ लाख रूपये तर उपविजेत्याला २ लाखाचे बक्षिस देण्यात येणार आहे. तर उपांत्य फेरीतील खेळाडूंना ७८००० रूपये इतके बक्षिस असून उपांत्य पूर्व आणि बाद फेरीतील खेळाडूंना प्रत्येकी ३२००० आणि १८००० रूपयांचे बक्षिस दिले जाणार आहे. तर दुहेरी स्पर्धतील विजेत्याला ही एवढ्याच रकमेचे बक्षिस दिले जाणार आहे.

First Published on: September 9, 2018 1:23 PM
Exit mobile version