विराटची भारताला ‘गोड’ भेट; ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय

विराटची भारताला ‘गोड’ भेट; ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय

विराट कोहली

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचे धडाकेबाज शतक आणि महेंद्रसिंह धोनीच्या अर्ध शतकाच्या खेळीमुळे टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा ४ चेंडू आणि ६ विकेट राखून विजय मिळवला आहे. फलंदाजीस पोषक असलेल्या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय ऑस्ट्रेलियाने घेतला होता. हा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या संघाला लाभदायक ठरला नाही. शॉन मार्शने या सामन्यात १३१ धावा काढल्या मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या सामन्यात टीम इंडियाने बाजी मारली. अखेरच्या षटकात ७ धावांची गरज होती. धोनीने पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला आणि नंतरच्या चेंडूवर एकेरी धाव घेत संघाला विजय मिळवून दिला. तीन सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने दुसरा सामना जिंकला आहे. या पूर्वी खेळला गेलेला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. त्यामुळे कसोटी मालिकेसह एकदिवसीय मालिका जिंकण्याचे टीम इंडियाचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आक्रमक सुरूवात

ऑस्ट्रेलियाचे २९९ धावांचे आव्हान घेऊन मैदानावर उतरलेल्या टीम इंडियाच्या शिखर धवन आणि रोहित शर्मा जोडगोळीने आक्रमक सुरूवात केली होती. रोहितपेक्षा शिखर आक्रमक होता. परंतू चेंडू फटकण्याच्या नादात धवन ३२ धावांवर बाद झाला. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या विराटबरोबर रोहितची जोडी चांगील जमली होती. रोहितही ४३ धावा काढल्यानंतर बाद झाला. अंबाती रायडूनही चांगले प्रदर्शन केले.

First Published on: January 15, 2019 7:04 PM
Exit mobile version