World Cup 2023 : श्रीलंकेला मोठा झटका, वर्ल्डकपचं तिकीट गमावल्यानं स्वप्न भंगलं

World Cup 2023 : श्रीलंकेला मोठा झटका, वर्ल्डकपचं तिकीट गमावल्यानं स्वप्न भंगलं

श्रीलंकेला आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ पूर्वी मोठा झटका बसला आहे. न्यूझीलंडविरोधात झालेल्या पराभवानंतर श्रीलंका विश्वचषकात थेट प्रवेश मिळण्यापासून वंचित राहिली आहे. न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका पार पडली. यावेळी एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडने श्रीलंकेचा पराभव केला. त्यामुळे तीन सामन्याची मालिका २-० च्या फरकाने जिंकली. या मालिकेत २-० ने पराभव झाल्यामुळे श्रीलंकेचे विश्वचषकात थेट क्वालिफाय होण्याचं स्वप्न भंगलं आहे.

श्रीलंकेने वर्ल्डकपचं तिकीट गमावल्यानं त्यांना साखळी फेरीपूर्वी असलेल्या पात्रता फेरीत खेळावं लागणार आहे. पात्रता फेरीत चांगली कामगिरी केल्यानंतर साखळी फेरीत स्थान मिळेल. न्यूझीलंड संघाने वर्ल्डकपमध्ये क्वालिफाय केलं आहे. तर श्रीलंकेकडे शेवटचा सामना जिंकत प्रवेश करण्याची संधी होती. पण सामना गमावल्याने नामुष्की ओढावली आहे.

श्रीलंका ८१ गुणांसह नवव्या स्थानावर आहे. तर ८८ गुणांसह वेस्ट इंडिज आठव्या क्रमांकावर आहे. भारत, न्यूझीलंड, बांगलादेश, अफगानिस्तान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांनी विश्वचषकात थेट क्वालिफाय केलेय. आता उर्वरित एका स्थानासाठी दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि आयरलँड यांच्यात लढत होणार आहे.

तीन सामन्याच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेसमोर सर्वबाद २७४ धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण श्रीलंकेचा संपूर्ण संघ २० षट्कात ७६ धावा करून बाद झाला. त्यानंतर दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला. तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेने न्यूझीलँडला सर्वबाद १५७ धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान न्यूझीलंडने ३३ षट्कात ४ गडी गमवून पूर्ण केलं.


हेही वाचा : त्याला खरेदी करण्यासाठी मी पैसे खर्च करेन, इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूचं बाबर आझमबद्दल मोठं विधान


 

First Published on: March 31, 2023 6:19 PM
Exit mobile version