IPL 2022 : Aaron Finch चा आयपीएलमध्ये अप्रतिम विक्रम, ९ संघातून खेळणारा पहिला खेळाडू

IPL 2022 : Aaron Finch चा आयपीएलमध्ये अप्रतिम विक्रम, ९ संघातून खेळणारा पहिला खेळाडू

ऑस्ट्रेलिया संघाचा सलामीवीर कर्णधार एॅरोन फिंचने आयपीएलमध्ये उत्कृष्ट आणि झंझावत अशी कामगिरी केली आहे. ९ संघातून खेळणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. कोलकाता नाईट रायडर्स या संघाने फिंचला विकत घेतले आहे. आयपीएल २०२२ चं मेगा ऑक्शन बंगळुरू येथे पार पडलं होतं. परंतु त्यामध्ये फिंचवर कोणत्याही संघाने बोली लावली नव्हती. तो अनसोल्ड खेळाडू ठरला होता. परंतु केकेआर या संघाने फिंचला विकत घेतलं असून ९ संघातून खेळणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे.

फिंच आतापर्यंत ८ संघात खेळला

एॅरोन फिंच आतापर्यंत आयपीएल संघाच्या ८ संघातून खेळला आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्स, गुजरात लायन्स, किंग्ज इलेव्हन पंजाब (आताचे पंजाब किंग्स), मुंबई इंडियन्स, पुणे वॉरियर्स, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आहेत. या संघामध्ये फिंचने सहभाग घेतला आहे. परंतु आता फिंच ९ संघातून खेळणार असून तो कोलकाता संघातून खेळताना दिसणार आहे.

या तीन संघांमध्ये अद्यापही सहभाग नाही

एॅरोन फिंच चेन्नई सुपर किंग्ज, गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून खेळला नसली तरी, २०२२ च्या हंगामात गुजरात आणि लखनौ संघात प्रथमच प्रवेश करणार आहे. चेन्नईने पहिल्या हंगामापासून ते आतापर्यंत ४ वेळी जेतेपद पटकावले आहे. परंतु अद्यापही या तीन संघांमध्ये त्याने सहभाग घेतलेला नाहीये.

फिंचने आयपीएलमध्ये खेळले ८७ सामने

२०२२ च्या हंगामासाठी फिंचची मूळ किंमत १.५ कोटी इतकी होती. मेगा लिलावात त्याला एकही खरेदीदार मिळाला नव्हता. फिंच सध्याच्या आयपीएल हंगामासाठी केकेआर संघात फलंदाज अॅलेक्स हेल्सची जागा घेणार आहे. त्याने बायो-बबलच्या थकव्याचे आणि कंटाळल्याचे कारण देत हेल्सने स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. फिंचने आयपीएलमध्ये आतापर्यंत ८७ सामने खेळले आहेत. दरम्यान, त्याने २५.७० च्या सरासरीने २००० हून अधिक धावा केल्या आहेत. ज्यामध्ये १४ अर्धशतकांचा समावेश आहे.

IPL 2022 चा हंगाम २६ मार्चपासून सुरू होणार आहे. २९ मे रोजी अंतिम सामना होणार आहे. KKR चे नेतृत्व श्रेयस अय्यर करणार आहे, तर CSK चे नेतृत्व एमएस धोनी करणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.


हेही वाचा : IND Vs WI : महिला विश्वचषकात स्मृती-हरमनप्रीतचा डबल धमाका, शतक झळकावत टीकाकारांची केली बोलती बंद


 

First Published on: March 12, 2022 12:38 PM
Exit mobile version