IND vs SA Test Series : आफ्रिकन संघाला मोठा झटका, शेवटच्या २ कसोटीतून डिकॉक होऊ शकतो बाहेर; काय कारण?

IND vs SA Test Series : आफ्रिकन संघाला मोठा झटका, शेवटच्या २ कसोटीतून डिकॉक होऊ शकतो बाहेर; काय कारण?

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी यजमानपद असलेल्या आफ्रिकन देशाला मोठा धक्का बसू शकतो. कारण आफ्रिकन संघाचा स्टार विकेटकीपर फलंदाज क्विंटन डिकॉक दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर होऊ शकतो. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, डिकॉक पिता होणार आहे. त्यामुळेच कौटुंबिक जबाबदारी लक्षात घेता तो क्रिकेटमधून काही कालावधी विश्रांती घेण्याची शक्यता आहे. डिकॉक शेवटच्या कसोटीत खेळू शकणार नाही, असे दक्षिण आफ्रिकेच्या निवड समितीचे समन्वयक व्हिक्टर पिटसांग सांगितले. दक्षिण आफ्रिका तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचे यजमानपद भूषवणार आहे, त्यातील पहिला सामना २६ डिसेंबरपासून सेंच्युरियन येथे होणार आहे.

माहितीनुसार, दक्षिण आफ्रिकेचा विकेटकीपर फलंदाज क्विंटन डिकॉक त्याच्या पहिल्या मुलाच्या जन्मामुळे भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडू शकतो. त्याची पत्नी साशा जानेवारीच्या सुरुवातीला आई होण्याची अपेक्षा आहे आणि बायो-बबल आणि इतर निर्बंधांमुळे तो दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडू शकतो.

आफ्रिकेच्या या निवेदनात म्हंटले आहे की, दक्षिण आफ्रिकेच्या निवड समितीचे समन्वयक व्हिक्टर पिटसांग यांना वाटते की डिकॉक शेवटचा कसोटी सामना खेळू शकणार नाही. दक्षिण आफ्रिका तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचे यजमानपद भूषवणार आहे, त्यामुळे जर डिकॉक तिसऱ्या सामन्यात खेळू शकला नाही तर हा आफ्रिकन संघाला मोठा झटका असणार आहे.

दरम्यान, दुसरा कसोटी सामना ३ जानेवारीपासून जोहान्सबर्गमध्ये तर तिसरा आणि कसोटी मालिकेतील शेवटचा सामना ११ जानेवारीपासून केपटाऊनमध्ये खेळवला जाईल. यानंतर या दोन्ही संघांमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.


हे ही वाचा : http://Mahila Jaivardhan : माजी कर्णधार महेला जयवर्धनेची श्रीलंकन संघाच्या सल्लागार प्रशिक्षक पदी नियुक्ती


 

First Published on: December 14, 2021 2:37 PM
Exit mobile version