BCCIच्या निवड समितीच्या प्रमुख पदासाठी अजित आगरकरचे नाव आघाडीवर

BCCIच्या निवड समितीच्या प्रमुख पदासाठी अजित आगरकरचे नाव आघाडीवर

भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडने 10 गडी राखून भारताचा पराभव केला. या पराभवानंतर चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती बीसीसीआयने बरखास्त केली आहे. त्यानंतर आता बीसीसीआय नव्या मुख्य निवडकर्त्याचा शोधात आहे. अशातच मुख्य निवडकर्त्यासाठी भारताचा माजी गोलंदाज अजित आगरकर याचे नाव आघाडीवर असल्याची माहिती समोर येत आहे. (ajit agarkar in race of bcci new team india chief selector)

BCCI ने शुक्रवार 18 नोव्हेंबर रोजी चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय निवड समितीची हकालपट्टी केली. तसेच, बीसीसीआयने निवड समितीच्या पदांसाठी शुक्रवारी नव्याने अर्ज मागवले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर नवा मुख्य निवडकर्ता होण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहे. अजित आगरकरने याआधीही या पदासाठी अर्ज केला होता.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अजित आगरकर याच्याशी याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. मात्र त्याला या पदासाठी अर्ज करायचा असेल तर ती पूर्णपणे त्याची चॉईस आहे. मागच्या वेळी तो या पदाच्या खूप जवळ आला होता, पण ते मिळवू शकला नाही. तो तरुण आहे, त्याचवेळी त्याला आयपीएलसह तिन्ही फॉरमॅट खेळण्याचा अनुभव आहे.

अजित आगरकर सध्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघात सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम करत आहे. मात्र, अगरकरने मुख्य निवडकर्ता पदासाठी अर्ज केल्यास, त्याला ते पद सोडावे लागेल. .

अजित आगरकरची क्रिकेट कारकीर्द-


हेही वाचा – विश्वचषकातील अपयशानंतर BCCIकडून संपूर्ण निवड समितीची हकालपट्टी

First Published on: November 19, 2022 5:21 PM
Exit mobile version