घरक्रीडाविश्वचषकातील अपयशानंतर BCCIकडून संपूर्ण निवड समितीची हकालपट्टी

विश्वचषकातील अपयशानंतर BCCIकडून संपूर्ण निवड समितीची हकालपट्टी

Subscribe

भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडने 10 गडी राखून भारताचा पराभव केला. या पराभवानंतर क्रिकेट चाहते निराश झाले आहेत. क्रिकेटच्या अनेक आजी-माजी खेळाडूंनी भारतीय संघाच्या खेळीवर आणि मॅनेजमेंटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडने 10 गडी राखून भारताचा पराभव केला. या पराभवानंतर क्रिकेट चाहते निराश झाले आहेत. क्रिकेटच्या अनेक आजी-माजी खेळाडूंनी भारतीय संघाच्या खेळीवर आणि मॅनेजमेंटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अशातच बीसीसीआयने चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीची हकालपट्टी केल्याची माहिती समोर येत आहे. (bcci sacks chetan sharma led senior national selection committee)

बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने इनसाईड स्पोर्टसला दिलेल्या माहितीनुसार, “बीसीसीआयने निवड समितीच्या पदांसाठी शुक्रवारी नव्याने अर्ज मागवले आहेत. ”संघ निवड करताना अनेक चुकीचे निर्णय घेतले गेले. आता नव्याने सुरुवात करायची आहे. निवड समितीतील काही सदस्यांचा कार्यकाळ संपायला आला आहे. नवीन सुरुवात करण्याचा आमचा विचार आहे. आम्हाल जे निकाल अपेक्षित होते ते मिळालेले नाही. जय शाह हे मेलबर्नवरून परतल्यानंतर आम्ही नवीन निवड समिती नेमण्याचा निर्णय घेतला”

- Advertisement -

भारताच्या पराभवानंतर अनेक तज्ज्ञांनी भारतीय संघाच्या खेळीवर प्रश्न उपस्थित केले. तसेच, भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी संघाच्या ‘वर्कलोड मॅनेजमेंट’वर टीका केली. एका वृत्तवाहिनीशी बोलताना सुनील गावस्कर यांनी वर्कलोड मॅनेजमेंटवरून रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियावर टीकेचा बाण सोडला. तसेच भारतीय क्रिकेटला ‘वर्कलोड मॅनेजमेंट’च्या पलीकडे जाण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. शिवाय, आयपीएल खेळताना वर्कलोड मॅनेजमेंट कुठे जाते? असा सवालही गावस्कर यांनी उपस्थित केला होता.


हेही वाचा – पावसामुळे भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी 20 सामना रद्द

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -