Hockey : माजी हॉकी प्रशिक्षक शोर्ड मरिनवर डेटा चोरीचा आरोप

Hockey : माजी हॉकी प्रशिक्षक शोर्ड मरिनवर डेटा चोरीचा आरोप

एका वृत्तपत्राने प्रकाशित केलेल्या वृत्तानंतर काही तासातच टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक असलेल्या शॉर्ड मरिन याचे भारतीय क्रीडा प्राधिकरणाने वेतन आणि उत्तर प्रदेश सरकारने जाहीर केलेले २५ लाख रूपयांचे बक्षीस अद्याप दिले नाही. शोर्ड मरिन हा २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाचा प्रशिक्षक राहिला आहे. तर आता शॉर्ड मरिन याच्यावर डेटा चोरी केल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर त्याच्या सोबत असलेला लॅपटॉप परत न केल्यास कारवाई करण्याची धमकी मरिन याला दिली आहे.

हॉकीच्या माजी प्रशिक्षकांवर चोरीचा आरोप केल्यानंतर भारतीय संघातर्फे सांगितले की, मरिनच्या प्रलंबित पगारावर मरिनची टिप्पणी म्हणजे भारताच्या क्रिडा प्रशासनावर एक काळा पडदा टाकण्याचा प्रयत्न आहे. शोर्ड मरिनचे फक्त १६०० डॉलर इतके वेतन बाकी आहे. त्यामुळे लॅपटॉप परत न केल्यास भारतीय हॉकी एनओसी जारी करू शकत नाही आणि त्यामुळेच भारतीय क्रिडा प्राधिकरणाला मरिनचा पगार रोखण्याचा अधिकार आहे. अशातच अमूल्य माहितीसह लॅपटॉप परत करण्यास सांगितल्यामुळे भारतीय क्रिडा प्रशासनाला बदनाम करण्याचा मरिनचा प्रयत्न आहे. असे भारतीय हॉकी तर्फे सांगण्यात आले आहे.

मंगळवारी, कोणत्याही संस्थेला दोष न देता माजी प्रशिक्षक शोर्ड मरिनने एका वृत्तपत्राला सांगितले की, “मला साईकडून शेवटचा पगार आणि उत्तर प्रदेश सरकारचे २५ लाख रूपयांचे बक्षीस अद्याप मिळालेले नाही. मी त्याबाबत सतत चौकशी करत आहे आणि या समस्येचे लवकरच निराकरण केले जाईल असे आश्वासन मला दिले आहे”.

तर यावरच भारतीय हॉकीचे सरचिटणीस राजिंदर सिंग यांनी बुधवारी एका निवेदनाद्वारे स्पष्टीकरण दिले की, “आम्ही हे स्पष्ट करू शकतो की, मरिन यांचे लॅपटॉप परत न करण्याचे कारण हे डेटा चोरी करणे आहे. त्यांच्याकडे असलेल्या लॅपटॉपमध्ये भारतीय संघाच्या खेळांडूची महत्त्वाची माहिती आहे. लॅपटॉप आणि डेटा सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी म्हणून आम्ही मरिन यांच्यावर दंडात्मक कारवाई करणार आहोत. यावर प्रतिक्रिया देताना नेदरलँडमध्ये राहणाऱ्या मरिनने सांगितले की, “तो लॅपटॉप ऑलिम्पिकमध्ये क्रॅश झालेला लॅपटॉप आहे. त्याला परत करण्याची प्रक्रिया आधीपासूनच सुरू आहे. मी तो लॅपटॉप दुरूस्त करण्यासाठी माझ्यासोबत आणला होता, पण तसे करता झाले नाही. मी लॅपटॉप परत करेन मला हरकत नाही. मला माहित नाही राजिंदर यांनी अशी का प्रतिक्रिया दिली. पण मी स्पष्ट करू शकतो की मला कोणाचाही अनादर करायचा नव्हता. मी नेहमीच भारताच्या हिताचा विचार केला आहे, असे मरिनने सांगितले.


हे ही वाचा: T20 2021 : Ind vs AFG विजयामुळे भारताचा रनरेट बदलला, सेमी फायनलचे नवे समीकरण काय ?


 

First Published on: November 4, 2021 3:21 PM
Exit mobile version