आरसीबीच्या एका निर्णयामुळे विराटसोबत चाहतेही नाराज

आरसीबीच्या एका निर्णयामुळे विराटसोबत चाहतेही नाराज

हंदवाडा येथील हुतात्म्यांना कोहलीने वाहिली श्रद्धांजली

आयपीएल २०२० सुरू होण्यास अजून काही महिने शिल्लक आहेत. यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली असून जगाभरात त्याचे चाहते आहेत. विराट कोहली, एबी डिबेटर्ससारखे संघात आरसीबीचे अनेक स्टार खेळाडू आहेत. मात्र आयपीएल च्या गेल्या १२ हंगामात एकदाही त्यांनी जेतेपद मिळवले नाही. पंरतु मध्यंतरी सोशल मीडियावर संघात बदल होणार असल्याचे संकेत मिळाले होते. तो कोणता बदल ते आज समोर आले आहे. आरसीबीने बुधवारी सोशल मीडियावरील त्यांच्या अधिकृत अकाऊंट्सवरील प्रोफाइल फोटो आणि नाव काढून घेतले आहे.

आरसीबीने अचानक फोटो काढून घेतल्यामुळे संघाच्या चाहत्यांसह क्रिकेटपटूंना देखील आश्चर्य वाटले आहे. या प्रकारमुळे खुद्द आरसीबी कर्णधार विराट कोहली सुद्धा हैराण झाला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या बेंगळुरूच्या संघाने त्यांच्या ट्विटर प्रोफाइलचे नाव बदलले आहे. तसेच डिसप्ले आणि कव्हर फोटो देखील हटवण्यात आला आहे. तर नावात बदल करत रॉयल चॅलेंजर्स असे ठेवण्यात आले आहे. अशाच प्रकारचा बदल इंस्टाग्राम आणि फेसबुकवर देखील करण्यात आला आहे. या बदलाची कोणतीही पूर्वकल्पना न देता हा बदल केला गेला आहे. संघाच्या कर्णधारालाही याची कल्पना दिली गेली नाही. यावर विराट कोहलीने ट्विटरवरून जाब विचारला आहे. आरसीबीच्या पोस्ट दिसत नाही, किमान कर्णधाराला तरी कळवायचे. तसेच तुम्हाला काही मदत हवी असेल तर मला कळवा. अश्याप्रकारचे ट्विट करून विराटने जाब विचारला आहे.

विराटच्या आधी भारताचा फिरकीपटू यजुवेंद्र चहल याने देखील आरसीबीने केलेल्या या बदलावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘अरे आरसीबी ही काय गुगली आहे. तुमचा प्रोफाईल फोटो आणि इंस्टाग्राम पोस्ट कुठे गेली?’, असा प्रश्न चहलने विचारला.

First Published on: February 13, 2020 3:02 PM
Exit mobile version