Big Bash League : आंद्रे रसेल प्रत्येक खेळाडूपासून २ मीटर राहणार दूर; खास ड्रेसिंग रूमचीही व्यवस्था

Big Bash League : आंद्रे रसेल प्रत्येक खेळाडूपासून २ मीटर राहणार दूर; खास ड्रेसिंग रूमचीही व्यवस्था

इंडियन प्रीमियर लीगमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणारा वेस्टइंडीजचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलने आता बिग बॅश लीगमध्ये पदार्पण केले आहे. त्याने ऑस्ट्रेलियाच्या या लीगमध्ये मेलबर्न स्टारकडून १० डिसेंबरला म्हणजेच शुक्रवारी पदार्पण केले आणि पहिला सामना खेळला. मात्र रसेलला या स्पर्धेत खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या बोर्डाने काही कडक नियम बनवले आहेत. लक्षणीय बाब म्हणजे आंद्रे रसेल या स्पर्धेत सर्व खेळाडूंपासून २ मीटर दूर राहणार आहे. तर त्याला या नियमाचे पालन सामन्यादरम्यान देखील करावे लागणार आहे. रसेलला वेगळ्या गेटमधून प्रवेश दिला जाणार आहे. तो संघासोबत ड्रेसिंग रूममध्येही राहू शकत नाही.

दरम्यान, रसेलसाठी वेगळ्या नेटची देखील व्यवस्था असणार आहे. सामन्यादरम्यान बळी घेतल्यानंतर आंद्रे रसेल इतर खेळाडूंसोबत आनंदही व्यक्त करू शकत नाही. काही दिवसांपू्र्वीच रसेलने टी-१० लीग खेळली आहे. ही लीग यूएमध्ये झाली होती. रसेल मागील आठवड्यात ऑस्ट्रेलियाला आला होता. अशातच त्याला ऑस्ट्रेलियातील कडक नियमांचे पालन करावे लागणार आहे. रसेल ऑस्ट्रेलियात फक्त ३ दिवस विलगीकरण कक्षात राहिला आहे, तर त्याला ७ दिवस राहणे बंधनकारक होते. त्यामुळे रसेलला जोपर्यंत ७ दिवस पूर्ण होत नाहीत तोपर्यंत या नियमांचे पालन करावे लागणार आहे.

पदार्पणाच्या सामन्यात रसेलच्या खात्यात १७ धावा

नियमांनुसार, सरावादरम्यान रसेलला सर्व खेळाडू आणि स्टाफ पासून २ मीटर अंतराहून लांब रहावे लागणार आहे. सामन्यादरम्यान विरूध्द संघाच्या खेळाडूंसोबत देखील याचे पालन करावे लागणार आहे. दरम्यान, आंद्रे रसेलने बीग बॅश लीगमध्ये त्याचा पहिला सामना सिडनी थंडरविरूध्द खेळला. या सामन्यात त्याला ६व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले. त्यामध्ये त्याने नाबाद ९ चेंडूत १७ धावा केल्या.


हे ही वाचा: http://Ravi Shastri : ‘मला ज्या प्रकारे हटवण्यात आले त्याने दु:ख झाले; भारतीय संघापासून वेगळे होताच शास्त्रींचा मोठा खुलासा


 

First Published on: December 10, 2021 7:54 PM
Exit mobile version