World Championship : अंशु मलिकने रचला इतिहास, अंतिम फेरीत प्रवेश करणारी पहिली भारतीय महिला पैलवान

World Championship : अंशु मलिकने रचला इतिहास, अंतिम फेरीत प्रवेश करणारी पहिली भारतीय महिला पैलवान

World Championship : अंशु मलिकने रचला इतिहास, अंतिम फेरीत प्रवेश करणारी पहिली भारतीय महिला पैलवान

हरियाणातील अंशु मलिकने विश्व चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत प्रवेश करत इतिहास रचला आहे. ती ह्या चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत जागा मिळवणारी पहिली भारतीय महिला पैलवान ठरली आहे. अंशुने युरोपीय ज्युनियर चॅम्पियन सोलोमिया विंकचा पराभव करून अंतिम फेरीत जागा मिळवली, त्याच युरोपीय विश्वविजेत्याला अस्वस्थ करणारी सरिता मोर उपांत्य फेरीत पराभूत झाली असून ती आता कांस्यपदकासाठी खेळणार आहे. १९ वर्षीय अंशुने उपांत्य फेरीत सुरूवातीपासूनच आपली पकड मजबूत ठेवली होती, तांत्रिक गुणांच्या आधारावर तिने ५७ किलो वजनी गटात अंतिम फेरी गाठली आहे.

यापुर्वी अगोदर भारतातील ४ महिला पैलवानांना विश्व चॅम्पियनशीपमध्ये पदक मिळाले होते पण सर्वाना कांस्य पदकावर संतुष्ट रहावे लागले होते. गीता फोगाट आणि बबीता फोगाट ने २०१२ ला, पूजा ढांडा ने २०१८ ला तर विनेश फोगाट ने २०१९ मध्ये कांस्य पदकांची कमाई केली होती. अंशु विश्व चॅम्पियनशीप मध्ये प्रवेश करणारी चौथी भारतीय महिला आहे. यापुर्वी अगोदर सुशील कुमार (२०१०), बजरंग पूनिया (२०१८), दीपक पूनिया (२०१९), यांनी अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. सुशील कुमारने सुवर्ण, तर बजरंग पूनियाने रौप्यपदक मिळवले होते.

दरम्यान दिपक पूनिया ने डोळ्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली होती, आणि त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तत्पूर्वी, अंशुने एकतर्फी लढतीत कझाकिस्तानच्या निलुफर रेमोवाचा तांत्रिक पराक्रमावर पराभव केला, आणि नंतर उपांत्यपूर्व फेरीत मंगोलियाच्या देवाचीमेग एर्खेमबायरचा ५-१ असा पराभव केला.

त्याचवेळी सरिता मोरचा बुल्गारियाच्या बिलयाना झिवकोवा ने ३-० असा पराभव केला. दिव्या काकरानने ७२ किलो वजनी गटात सेनिया बराकोवाला चितपट केले, पण जपानच्या अंडर २३ विश्व चॅम्पियन मसाको फुरूइच विरूध्दच्या सामन्यात तिला तांत्रिक गुणांच्या आधारावर पराभव स्विकारावा लागला होता. ह्याचदरम्यान किरणने ७६ किलो वजनी गटात तुर्कीच्या आयसेगुल ओजबेगे विरूध्दचा रेपचेजचा सामना जिंकून कास्य पदकाच्या प्ले-ऑफ मध्ये जागा मिळवली, पण पूजा जाटला ५३ किलो वजनी गटात रेपचेजच्या सामन्यात इक्वाडोरच्या एलिजाबेथ मेलेंड्रेस विरूध्द पराभव पत्करावा लागला.


हेही वाचा : महिला एकेरीत मधुरिका पाटकर, तर पुरुष एकेरीत रेगन विजयी


 

First Published on: October 7, 2021 3:10 PM
Exit mobile version