Copa America 2021 च्या विजेतेपदावर अर्जेंटीनाचे नाव, मेस्सीने जिंकली पहिली आंतरराष्ट्रीय ट्रॉफी

Copa America 2021 च्या विजेतेपदावर अर्जेंटीनाचे नाव, मेस्सीने जिंकली पहिली आंतरराष्ट्रीय ट्रॉफी

Copa America 2021 च्या विजेतेपदावर अर्जेंटीनाचे नाव, मेस्सीने जिंकली पहिली आंतरराष्ट्रीय ट्रॉफी

कोपा अमेरिका २०२१चा अंतिम सामना अर्जेंटीनाने जिंकला. (Argentina wins Copa America 2021 Final Match) १९९३ नंतर अर्जेटीनाच्या संघाने कोपा अमेरिकेचा अंतिम सामना जिंकला होता. तब्बल २८ वर्षांनंतर अर्जेंटीनाने कोपा अमेरिका स्पर्धेत विजय मिळवला आहे. कोपा अमेरिका २०२१च्या अंतिम सामन्यात अर्जेंटीनाच्या संघाने आर्क ब्राझीलचा १-० ने पराभव केला.  स्टार फुटबॉलर आणि अर्जेंटीनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीने संघाचे नेतृत्व केले. मेस्सीच्या नेतृत्वात अर्जेंटीनाने हा सामना जिंकला. मेस्सीला पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय ट्रॉफी पटकावली आहे.  ( Messi wins first international trophy) त्यामुळे मेस्सीचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

कोपा अमेरिका २०२१च्या अंतिम सामन्यात मेस्सी आणि नेमार हे खेळाडू एकमेकांविरोधात मैदानात उतरले होते. त्यामुळे फुटबॉल प्रेमींसाठी यंदाचा कोपा अमेरिका सामाना खास ठरला आहे. एंजल डी मारियाने २१ व्या मिनिटाला गोल करुन संघाचा विजय केला. १९९३ नंतर अर्जेंटीनाच्या संघाने ४ वेळा कोपा अमेरिकेचा अंतिम सामना जिंकला होता. विश्वचषक स्पर्धेतही ते अंतिम सामन्यापर्यंत पोहचले होते. तर ब्राईलने आतापर्यंत ९ वेळा कोपा अमेरिका स्पर्धा जिंकली आहे. २०१९मध्ये देखील ब्राझीलने कोपा अमेरिकेचा अंतिम सामना जिंकला होता.

फुटबॉल वर्ल्ड कप, युरो कपनंतर कोपा अमेरिका ही तिसरी सर्वाधिक पाहिली जाणारी फुटबॉल स्पर्धा आहे. इंग्रजीत कोपा अमेरिका म्हणजे अमेरिकन कप. १९७५ पर्यंत या स्पर्धेला साऊथ अमेरिकन फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धा म्हणून ओळखले जात होते. कोपा अमेरिका ही स्पर्धा फार जुनी फुटबॉल स्पर्धा म्हणून परिचीत आहे. कोपा स्पर्धेला Commebol कोपा अमेरिका असेही म्हटले जाते.


हेही वाचा – UEFA EURO : युरोपात वर्चस्वाची लढाई; इंग्लंड, इटलीचे जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचे लक्ष्य

First Published on: July 11, 2021 10:56 AM
Exit mobile version