IPL 2021 : खेळाडू लिलावात अर्जुन तेंडुलकरला ‘हा’ संघ करणार खरेदी?  

IPL 2021 : खेळाडू लिलावात अर्जुन तेंडुलकरला ‘हा’ संघ करणार खरेदी?  

अर्जुन तेंडुलकर

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या आगामी मोसमाआधी होणाऱ्या खेळाडू लिलावाबाबत (Auction) सध्या बरीच चर्चा होत आहे. आयपीएलच्या १४ व्या मोसमासाठीचा खेळाडू लिलाव १८ फेब्रुवारीला चेन्नई होणार आहे. या लिलावात स्टिव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेल यांसारख्या ऑस्ट्रेलियाच्या स्टार खेळाडूंसह भारताच्या काही युवा, प्रतिभावान खेळाडूंना कोणते संघ खरेदी करणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. या युवा भारतीय खेळाडूंमध्ये सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचाही समावेश आहे. अर्जुन मागील काही मोसमांमध्ये मुंबई इंडियन्स (MI) संघाच्या नेट्समध्ये गोलंदाजी करत दिसायचा. त्यामुळे आता मुंबईचा संघ त्याला यंदाच्या खेळाडू लिलावात खरेदी करू शकेल. अर्जुन डावखुरा वेगवान गोलंदाज असून फलंदाजी करण्याचीही त्याच्यात क्षमता आहे.

मुश्ताक अली पदार्पण

अर्जुनने काही दिवसांपूर्वीच सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत पदार्पण केले होते. त्यामुळे तो आयपीएल खेळाडू लिलावात सहभागी होण्यासाठी पात्र ठरला. अर्जुनने हरियाणाविरुद्धच्या सामन्यात मुंबईकडून मुश्ताक अली स्पर्धेत पदार्पण केले. या सामन्यात त्याला खाते उघडता आले नाही, पण गोलंदाजीत त्याने १ विकेट घेतली. तसेच वानखेडे येथे झालेल्या पुदुच्चेरीविरुद्धच्या सामन्यात त्याने ३३ धावांत १ विकेट घेतली. फलंदाजीत मात्र तो पुन्हा अपयशी ठरला.

वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवणार? 

आता अर्जुन आयपीएलच्या आगामी मोसमात खेळताना दिसू शकेल. अर्जुनने मुंबईकडून सामना खेळल्यामुळे तो लिलावासाठी पात्र ठरला आहे. त्याला ऑनलाईन पद्धतीने लिलावात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त करावी लागले. अर्जुन लिलावात सहभागी झाल्यास मुंबई इंडियन्सचा संघ त्याला खरेदी करू शकेल. सचिन तेंडुलकरने मुंबई इंडियन्सकडून ७८ आयपीएल सामने खेळले होते. आता अर्जुन वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करताना दिसू शकेल.


हेही वाचा – इंग्लंड कसोटी मालिकेत ‘या’ भारतीय खेळाडूची भूमिका महत्वाची!


 

First Published on: January 29, 2021 4:06 PM
Exit mobile version