अर्जुन तेंडुलकर मुंबई टी-२० लीगच्या लिलावात सामील

अर्जुन तेंडुलकर मुंबई  टी-२० लीगच्या लिलावात सामील

अर्जुन तेंडुलकर

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा मुलगा अर्जुन तेंडूलकरचे नाव टी-२० मुंबई लीगच्या लिलावमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. अर्जुन हा १९ वर्षांचा असून डावखुरा मध्यमगती गोलंदाज आणि फलंदाज आहे. अतुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जुनने आपल्या गोलंदाजीच्या शैलीमध्ये फरक केलेला आहे. याखेरीज सुब्रतो बॅनर्जी यांच्या मार्गदर्शनाखालीही त्याने सराव केलेला आहे. त्याने १९ वर्षांखालील गटात श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटींमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. या अर्जुनच्या समावेशामुळे मुंबई लीगच्या या लीलावाकडे सगळ्याच चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

वडीलांच्या पावलावर पाऊल

१९ वर्षाचा हा खेळाडू डीव्हाय पाटील टी-२० मालिकांमध्ये देखील खेळला होता. त्याने मुंबईच्या अंडर-२३ संघात आपली जागा बनवली होती. क्रिकेट विश्वात सचिन तेंडूलकरने आपल्या क्रिकेट करिअरमध्ये फलंदाजीचे सगळेच रेकॉर्ड तोडले होते. आता अर्जुन तेंडूलकरही आपल्या वडीलांच्या पावलावर पाऊल टाकत क्रिकेट विश्वामध्ये आपला वेगळा ठसा उमटविण्याच्या प्रयत्नात आहे.

८व्या वर्षापासून क्रिकेटचे धडे 

वयाच्या ८व्या वर्षापासून वडीलांचा आदर्श ठेवत क्रिकेटचे धडे गिरवण्यास सुरूवात केली. २२ जानेवारी २०१० साली अर्जुनने पुण्यात १३ वर्षांखालील गटात पहिला सामना खेळला होता. तेव्हापासून त्याने त्याचा प्रवास असाच कायम ठेवला. याच पार्श्वभूमीवर अर्जुन तेंडूलकरचे नाव टी-२० मुंबई लीगच्या लिलावमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.

First Published on: March 17, 2019 8:53 PM
Exit mobile version