Ashes Series 2021 : Aus vs Eng दुसऱ्या Pink-Ball कसोटीत ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व इंग्लंड मोडणार?

Ashes Series 2021 : Aus vs Eng दुसऱ्या Pink-Ball कसोटीत ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व इंग्लंड मोडणार?

सध्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये ॲशेस कोसटी मालिकेचा थरार सुरू आहे. अशातच दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलियाविरूध्द १६ डिसेंबरला होणाऱ्या पिंक बॉल कसोटी सामन्यात प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे ब्रिस्बेनमध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवाचा बदला घेण्याची संधी इंग्लिश संघाला असणार आहे. तर दुसराही सामना जिंकून मालिकेत आघाडी मिळवण्यासाठी यजमान ऑस्ट्रेलिया मैदानात उतरेल. दोन्ही संघातील हा बहुचर्चित सामना एडिलेडमध्ये होणार आहे. दरम्यान मालिकेच्या पहिल्या सामन्यात इंग्लिश संघाला कांगारूच्या संघाने ९ गडी राखून पराभूत केले होते. त्यामुळे हा सामना इंग्लिश संघासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर इंग्लंडच्या संघाने दुसऱ्याही सामन्यात विजय मिळवला नाही तर मालिकेत पुनरागमन करणे इंग्लंडला कठीण होईल. या सामन्याची सुरूवात भारतीय वेळेनुसार गुरूवारी सकाळी ९.३० वाजता होईल.

अँडरसन-ब्रॉडचे पुनरागमन

दरम्यान, दुसऱ्या दिवस-रात्र सामन्यासाठी इंग्लंडचे वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड फिट झाले आहेत. त्यामुळे हे दोन्हीही खेळाडू दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघाचा भाग असणार आहेत. संघाचे प्रशिक्षक (coach) क्रिस सिल्व्हरवुड यांनी याबाबत माहिती दिली होती. अँडरसन आणि ब्रॉड या मालिकेतील पहिल्या सामन्यात संघात नव्हते आणि इंग्लंडने हा सामना ९ बळींच्या मोठ्या फरकाने गमावला होता. त्यानंतर या दोन अनुभवी खेळाडूंना संघातून बाहेर ठेवल्यामुळे क्रिकेट वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या होत्या.

ऑस्ट्रेलियाच्या संघात बदल

ब्रिस्बेनमधील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोस हेजलवुडला दुखापत झाली होती. त्याला पाठीचा त्रास जाणवत असल्याने त्याच्या जागेवर ऑस्ट्रेलियन संघात २५ वर्षीय वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसनला संधी मिळाली आहे. त्याच्याकडे दोन कसोटी सामन्यांचा अनुभव आहे. त्याने आतापर्यंत २०.५० च्या सरासरीने ६ बळी पटकावले आहेत. दरम्यान रिचर्डसनने फेब्रुवारी २०१९ मध्ये श्रीलंकेविरूध्द शेवटचा कसोटी सामना खेळला होता. सोबतच ऑस्ट्रेलियन संघाचा सलामीवीर डेविड वॉर्नर फिट झाल्याने यजमान संघ अधिक मजबूत झाला आहे. वॉर्नरने ब्रिस्बेनमधील पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात ९४ धावांची खेळी केली होती मात्र त्याला दुखापत झाली होती. दरम्यान आता तो फिट असल्याचे समजते.

दुसऱ्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ

डेविड वॉर्नर, मार्कस हॅरिस, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमरून ग्रीन, ॲलेक्स कॅरी, पॅट कमिंन्स, मिचेल स्टार्क, झाय रिचर्डसन, नाथन लायन,


हे ही वाचा:  http://PAK vs WI: दुसऱ्या टी-२० मध्ये पाकिस्तानची फजिती; आवाहन करूनही कराची स्टेडियमवर ४००० पेक्षा कमी लोक


 

 

 

 

First Published on: December 15, 2021 5:14 PM
Exit mobile version