अश्विनचे कृत्य अतिशय चूकीचे

अश्विनचे कृत्य अतिशय चूकीचे

शेन वॉर्न

आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार रविचंद्रन अश्विनने जॉस बटलरला ज्याप्रकारे धावचीत केले, त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा महान गोलंदाज आणि राजस्थान रॉयल्स संघाचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर शेन वॉर्नने ट्विटरच्या माध्यमातून अश्विनवर टीका केली आहे. अश्विनचे कृत्य अतिशय चुकीचे होते असे वॉर्नने ट्विटमध्ये लिहिले.
एक कर्णधार आणि माणूस म्हणून रविचंद्रन अश्विनने मला खूप निराश केले आहे. आयपीएलमधील सर्व कर्णधार स्पर्धा सुरू होण्याआधी आपण खेळाडूवृत्तीने खेळू असे कबूल करतात. अश्विनला चेंडू टाकायचाच नव्हता, त्यामुळे हा चेंडू रद्द केला पाहिजे होता. आता बीसीसीआयने याबाबत काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. जे झाले ते योग्य नव्हते. एक कर्णधार म्हणून तुम्ही तुमचा संघ कशा पद्धतीने खेळणार हे ठरवता.

मग असे चुकीचे आणि लज्जास्पद कृत्य करावेच कशासाठी? अश्विन तू आता माफीही मागू शकत नाहीस. ती वेळ निघून गेली आहे. आता लोक तुला यासाठीच लक्षात ठेवणार. जिंकण्यासाठी काहीही करणे योग्य आहे ही मानसिकता बदललीच पाहिजे. खेळाडूवृत्ती आणि खेळाबद्दलचा आदर हे सर्वात महत्त्वाचे आहे. आपण युवा मुलं-मुलींसमोर योग्य उदाहरण ठेवणे गरजेचे आहे. तसेच जे लोक (माजी खेळाडूही) अश्विनचे कृत्य हे नियमातच होते, पण मी तसे करणार नाही किंवा मला ते आवडले नाही असे म्हणत आहेत, त्यांना मी विचारेन की ‘तुम्ही तसे का नाही करणार?’ ! याचे उत्तरही सोपे आहे. कारण तसे करणे अतिशय चुकीचे आणि लज्जास्पद आहे व ते खेळाडूवृत्तीच्या विरोधात आहे, असे वॉर्नने ट्विटमध्ये लिहिले.

First Published on: March 27, 2019 4:01 AM
Exit mobile version