क्रीडा रसिकांना अफगाणिस्तानक़डून अटीतटीच्या सामन्याची अपेक्षा

क्रीडा रसिकांना अफगाणिस्तानक़डून अटीतटीच्या सामन्याची अपेक्षा

IND vs AFG (सोजन्य - ट्विटर)

युनायटेड अरब एमिरेट्समध्ये सध्या आशिया कप स्पर्धा सुरू आहे. भारताचे या स्पर्धेत आतापर्यंत प्रदर्शन चांगले राहिले आहे. आतापर्यंत झालेले चारही सामने भारताने जिंकले आहेत. टॉप ४ मध्ये पोहोचल्यानंतर आज भारताचा अफगाणिस्तानविरुद्ध सामना आहे. भारतीय वेळेनुसार ५ वाजता सामना सुरू होणार आहे. भारताने अंतिम फेरीतील स्थान यापूर्वीच निश्चित केले असून आजचा सामना जिंकून भारत विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी प्रयत्नशील राहील. नवख्या हाँगकाँगविरोधात सामना जिंकण्यासाठी भारताला खूप मेहनत करावी लागली. परंतु त्यापुढच्या तिन्ही सामन्यात भारताने उत्कृष्ट प्रदर्शन केले. पाकिस्तानविरोधात दोन आणि बांग्लादेशविराधात झालेल्या एका सामन्यात भारताने एकहाती विजय मिळवले. तर दुसऱ्या बाजुला अफगाणिस्तानच्या संघानेदेखील नवखा संघ असून चांगले प्रदर्शन केले. अफगाणिस्तानने अनुभवी श्रीलंकेच्या संघाला आशिया कप स्पर्धेतून बाहेर काढले आहे. तसेच बांग्लादेशलादेखील पराभवाची चव चाखायला लावली असल्यामुळे अफगाणिस्तानचे बळ वाढले आहे. त्यामुळे आजचा सामना एकतर्फी होणार नसल्याचे अनेक क्रीडारसिकांचे मत आहे. भारतासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध विजय मिळवत आपल्या मोहिमेचा शेवट गोड करण्यास अफगानी संघ प्रयत्नशील राहील. त्यांनी या स्पर्धेत आपल्या प्रतिस्पर्ध्यांना तगडं आव्हान दिलंय, पण अनुभवाच्या अभावामुळे संघ मोक्याच्या क्षणी ढेपाळल्याचे या स्पर्धेत पहायला मिळाले आहे.

कोण किती पाण्यात?

भारताने आशिया कपमध्ये चांगले प्रदर्शन केले आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही आघाड्यांवर भारताचे प्रदर्शन चांगले राहिले आहे. भारतातर्फे शिखर धवनने सर्वाधिक ३२७ आणि कर्णधार रोहित शर्माने २६९ धावा केल्या आहेत. परंतु चारही सामन्यात संघाच्या मधल्या फळीतील फलंदाजांना खेळण्याची संधी मिळालेली नाही. त्यामुळे भारताच्या मधल्या फळीतील खेळाडुंना आजच्या सामन्यात खेळण्याची संधी मिळू शकते. भारतीय फिरकी गोलंदाजांनी संपूर्ण स्पर्धेत प्रतिस्पर्धी संघांवर वर्चस्व गाजवले. यजुवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांनी जलदगती गोलंदाजी चांगली करुन सामन्यांमध्ये योगदान दिले आहे.

उभय संघ

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), शिखर धवन, अंबाती रायडू, दिनेश कार्तिक, केदार जाधव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, दीपक चाहर, सिद्धार्थ कौल, मनीष पांडे.
अफगाणिस्तान : असगर अफगान (कर्णधार), मोहम्मद शहजाद (मोहम्मद शहजाद), इहसानुल्लाह जमात, जावेद अहमदी, रहमत शाह, हस्मत शाहिदी, मोहम्मद नबी, गुलबदीन नाइब, राशिद खान, नजीबुल्लाह जादरान, मुजीब उर रहमान, आफताब आलम, समीउल्लाह शेनवारी, मुनीर अहमद, सईद अहमद शेरजाद, अशरफ , मोमांद वफादार.

 

 

First Published on: September 25, 2018 3:56 PM
Exit mobile version