Asia Cup – Ind vs Ban live updates : भारताची दमदार सुरूवात, बिनबाद ५०
My Mahanagar Team
१७४ धावांचा पाठलाग करताना भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी चांगली सुरूवात केली आहे.
रविंद्र जडेजाने घेतलेल्या ४ विकेटमुळे बांगलादेशला १७३ धावाच करता आल्या. बांगलादेशकडून मेहदी हसनने सर्वाधिक ४२ धावा केल्या. तर बुमराह आणि भुनेश्वर कुमारने ३-३ विकेट घेतल्या.
रविंद्र जडेजाने शकिब, मोहम्मद मिथून आणि मुशफिकूर रहिम यांना झटपट माघारी पाठवले आहे.
या सामन्यातून एकदिवसीय संघात पुनरागमन करणाऱ्या रविंद्र जडेजाने आपल्या पहिल्याच शतकात विकेट घेतली.
भुवनेश्वर आणि बुमराह या दोघांनीही १-१ विकेट घेतली आहे.
बांगलादेशच्या फलंदाजीची सुरुवात खराब झाली आहे. त्यांचे सलामीवीर अवघ्या १७ धावांत माघारी परतले आहेत.
या सामन्यात दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेलेल्या हार्दिक पांड्याच्या जागी रविंद्र जडेजाला संघात संधी मिळाली आहे.
सुपर ४ फेरीच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.