Asian Games 2018 : बजरंग पुनियाने पटकाविले पहिले सुवर्णपदक

Asian Games 2018 : बजरंग पुनियाने पटकाविले पहिले सुवर्णपदक

बजरंग पुनिया

इंडोनेशियातील जकार्ता आणि पालेबांग येथे १८ व्या आशियाई खेळांचा पहिला दिवस भारतासाठी अप्रतिम ठरला असून भारताने पहिल्याच दिवशी सुवर्णपदक मिळवले आहे. भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनियाने ६५ किलो वजनी गटात जपानच्या दाईची ताकातानी याला ११-८ असे पराभूत करत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले आहे.

वाचा – Asian Games 2018 : अपूर्वी चंदेला आणि रवी कुमारने पटकावले कांस्यपदक

पहिल्या दिवशी भारताची उत्तम कामगिरी

भारताला पहिल्या दिवशी पदकांची चांगली कमाई झाली असून कुस्तीपटू बजरंगने भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देण्याआधी १० मीटर एअर रायफल मिक्स्ड स्पर्धेत भारताला अपूर्वी चंदेला आणि रवीकुमार या जोडीने कांस्य पदक मिळवून दिले आहे. तर दुसरीकडे महिला कबड्डी संघ आणि पुरूष संघ यांनी आपल्या पहिल्या सामन्यात विजय मिळवला आहे.

सौजन्य – टाईम्स ऑफ इंडिया

स्वर्गीय अटलजींना पदक समर्पित

एशियाड गेम्स २०१८ मध्ये पुनियाने भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले असून त्याने हे पदक भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले आहे. बजरंगने आपल्या ऑफिशिअल ट्विटर हँडलवरून ट्विट करुन  आपले सुवर्णपदक अटलजींना समर्पित केले आहे.

First Published on: August 20, 2018 8:03 AM
Exit mobile version