Asian games 2018: भारतीय हॉकी टीमने श्रीलंकेचा २०-० ने केला पराभव

Asian games 2018: भारतीय हॉकी टीमने श्रीलंकेचा २०-० ने केला पराभव

भारतीय हॉकी टीमने श्रीलंकेचा केला पराभव

जकार्तात सुरु असलेल्या १८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष हॉकी टीमने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. भारतीय हॉकी टीमने श्रीलंकेचा २०-० ने पराभव करत सेमी फायनलमध्ये उडी मारली आहे. भारताचा साखळी फेरीतील हा पाचवा विजय आहे. २०० वा सामना खेळणाऱ्या रुपिंदर पाल सिंह आणि आकाशदीपने या सामन्यामध्ये भारतासाठी हॅट्रीक केली आहे.

असा झाला सामना

भारतीय हॉकी टीमने आजच्या सामन्याची शानदार सुरुवात केली. पहिल्याच मिनिटामध्ये रुपिंदर पाल सिंहने गोल करत १-० स्कोर केला. चौथ्या मिनिटानंतर हरमनप्रीतने गोल करत स्कोर दुप्पट केला. त्यानंतर आकाशदीपने ९ व्या, ११व्या आणि १७ व्या मिनिटाला लागोपाठ गोल करत स्कोर ५-० केला. हरमनप्रीतने २१ व्या आणि आकाशदीप याने पुन्हा २२ व्या मिनिटाला गोल करत मध्यांतरापर्यंत ७-० असा स्कोर केला. या संपूर्ण सामन्यामध्ये मध्यांतरापर्यंत आकाशदीप सिंहने ४ गोल केले.

हॉकी टीमने ५ सामन्यात केले ७६ गोल

भारताच्या हॉकी टीमने पाच सामन्यांमध्ये एकूण ७६ गोल केले आहे. भारताच्या आकाशदीप सिंहने ६ गोल तर रुपिंदर पाल सिंह, हरमनप्रीत आणि मनदीप सिंहने प्रत्येकी ३ गोल केले आहेत. या व्यतिरिक्त उत्तरप्रदेशच्या ललित उपाध्यायने २, दिलप्रीत, अमित आणि विवेकने प्रत्येकी १ गोल केला आहे.

First Published on: August 28, 2018 7:34 PM
Exit mobile version