Asian games 2018: महिला कबड्डी संघाची फायनलमध्ये उडी

Asian games 2018:  महिला कबड्डी संघाची फायनलमध्ये उडी

महिला कबड्डी टीम फायनलमध्ये दाखल(सौजन्य-ट्विटर)

एशियन गेम्समध्ये दिवसेंदिवस चुरस वाढत चालली आहे. भारताने आतापर्यंत १७ पदकांची कमाई केली आहे. आज रंगलेल्या महिला कबड्डी सेमीफायनल मॅचमध्ये भारताने दमदार कामगिरी करत विजय मिळवला आहे आणि फायनलमध्ये उडी घेतली आहे. भारत विरुद्ध तैवान असा आजचा कबड्डीचा सामना रंगला होता. आता इराण किंवा थायलंड या संघाविरुद्ध कबड्डीचा अंतिम सामना रंगणार आहे. पण एक मात्र नक्की की, भारताला कबड्डीत रौप्यपदक मिळणार आहे.

सहज मारली सेमीफायनल

चायनीज ताय पाय म्हणजे तैवान या संघासोबत आजचा सामना सुरु झाला. पण भारतीय संघाने हा सामना सहज खिशात घातला.२७-१४ असा स्कोर करत ही सेमीफायनल जिंकली. त्यामुळे उद्या होणाऱ्या फायनल मॅचकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

उद्या ठरणार पदक

साखळी फेऱ्या पार करत भारतीय महिला कबड्डी संघ फायनलमध्ये पोहोचला आहे. भारताविरुद्ध फायनलला आता कोणता संघ खेळणार ? हे अद्याप ठरले नसले. तरी इराण आणि थायलंड यामधील सामन्यात जो जिंकेल तो फायनलमध्ये  भारतविरुद्ध खेळणार आहे. त्यामुळे भारताचे रौप्यपदक निश्चित आहे.

First Published on: August 23, 2018 3:59 PM
Exit mobile version