Asian Games 2018 : बजरंग पुनिया आणि संदीप तोमर उपांत्यपूर्व फेरीत दाखल

Asian Games 2018 : बजरंग पुनिया आणि संदीप तोमर उपांत्यपूर्व फेरीत दाखल

बजरंग पुनिया आणि संदीप तोमर

इंडोनेशियातील जकार्ता आणि पालेबांग येथे १८ वे आशियाई खेळांना सुरूवात झाली आहे. भारताने पहिल्या दिवशी आतापर्यंत उत्तम कामगिरी केली आहे. सर्वात आधी महिला कबड्डी संघ आणि पुरूष संघ यांनी आपल्या पहिल्या सामन्यात विजय मिळवला आहे. तर १० मीटर एअर रायफल मिक्स्ड स्पर्धेत पदक मिळवले असून भारताची अपूर्वी चंदेला आणि रवीकुमार या जोडीने मिक्स्ड स्पर्धेत कांस्य पदक पटकावले आहे. यांच्यापाठोपाठ आता कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि संदीप तोमर यांनीही पहिल्या सामन्यात विजय मिळवत थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला आहे.


बजरंग पुनियाने ६५ किलो वजनी गटामध्ये उजबेकिस्तानच्या खासानोव सिरोजिदीन याला नमवत सामना आपल्या नावे केला. तर दुसरीकडे ५७ किलो वजनी गटामध्ये संदिप तोमरने तुर्कमेनीस्तानच्या नाझारोव रूस्तमला नमवत उपांत्यपूर्व फेरी घाटली आहे. भारताच्या दोन्ही कुस्तीपटूनी सामन्याच्या सुरूवातीपासूनच चतुर आणि आक्रमक खेळ दाखवत सामन्यात आपले वर्चस्व प्रस्थापीत केले होते.

First Published on: August 19, 2018 3:16 PM
Exit mobile version