चहा विकणारा पंतप्रधान झाला पण ब्रॉन्झ पदक विजेत्याला चहा विकावा लागतोय !

चहा विकणारा पंतप्रधान झाला पण ब्रॉन्झ पदक विजेत्याला चहा विकावा लागतोय !

सौजन्य - ANI

भारतीय खेळांत आपण असे अनेक खेळाडू पाहत असतो जे खडतर प्रवास करून यशाच्या शिखरावर पोहोचतात. हरीश कुमार या खेळाडूचा प्रवासही काहीसा असाच आहे. तो सेपक टकरॉ या खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करतो. भारताने या एशियन गेम्समध्ये विक्रमी कामगिरी केली. त्यांनी या स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली होती. पण आता स्पर्धा संपल्यावर त्याने आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हरीशने वडिलांच्या चहाच्या टपरीवर काम करण्यास सुरुवात केली आहे.

चांगल्या भविष्यासाठी नोकरीची आवश्यकता

हरीश ANI शी मुलाखतीत म्हणाला, “माझ्या कुटुंबात खूप सदस्य आहेत. पण या तुलनेत घरात कमावणारे लोक कमी आहेत. त्यामुळे मला माझ्या वडिलांच्या चहाच्या टपरीवर काम करावे लागते. दिवसात दुपारी २ ते संध्याकाळी ६ हा वेळ मी सरावासाठी राखून ठेवतो. पण भविष्यात या खेळात अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी मला चांगल्या नोकरीची गरज आहे.”

प्रशिक्षक हेमराज यांच्यामुळे झाली खेळात एन्ट्री 

मी २०११ मध्ये सेपक टकरॉ हा खेळ खेळण्यास सुरूवात केली. एकदा मी स्थानिक स्पर्धेत खेळत असताना प्रशिक्षक हेमराज यांनी स्थानिक स्पर्धेत मला पहिले. त्यांनी मला ‘साई’ (भारतीय क्रीडा प्राधिकरण) च्या कार्यालयात नेले. यानंतर मला सरकारकडून इतर मदत मिळण्यास सुरुवात झाली. मी पुढेही ही मेहनत करत राहीन. कारण मला देशाला अजून बरीच पदकं जिंकवून द्यायची आहेत.
First Published on: September 7, 2018 5:14 PM
Exit mobile version