आशियाई कुस्ती स्पर्धा

आशियाई कुस्ती स्पर्धा

बजरंगची सुवर्ण कामगिरी

भारताचा आघाडीचा कुस्तीपटू बजरंग पुनियाने आशियाई कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावले. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या बजरंगने ६५ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात कझाकस्तानच्या सयातबेक ओकासोव्हचा १२-७ असा पराभव केला. हा अंतिम सामना खूपच चुरशीचा झाला. सामना संपायला केवळ ६० सेकंद बाकी असताना बजरंग २-७ असा पिछाडीवर होता. मात्र, या ६० सेकंदात त्याने सलग १० गुण मिळवत सुवर्णपदक आपल्या नावे केले.

अंतिम सामना संपायला काहीच वेळ बाकी असताना सयातबेक थकलेला दिसत होता. याचाच फायदा घेत, दबावात चपळतेने खेळ करत बजरंगने हा सामना जिंकला. बजरंगचे आशियाई कुस्ती स्पर्धेमधील हे दुसरे सुवर्णपदक आहे.

याआधी त्याने २०१७ मध्ये सुवर्णपदक पटकावले होते. तर बजरंगचे हे या स्पर्धेतील एकूण पाचवे पदक होते. या स्पर्धेच्या ७९ किलो वजनी गटात प्रवीण राणालाही सुवर्णपदक मिळवण्याची संधी आहे. त्याने कझाकस्तानच्या उसेरबायेव्हचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

First Published on: April 24, 2019 4:38 AM
Exit mobile version