Aus Vs Eng 5th Ashesh Test : इंग्लंडने ५६ धावांमध्ये गमावल्या १० विकेट्स, ऑस्ट्रेलियाने ४-० ने जिंकली अॅशेज सिरीज

Aus Vs Eng 5th Ashesh Test : इंग्लंडने ५६ धावांमध्ये गमावल्या १० विकेट्स, ऑस्ट्रेलियाने ४-० ने जिंकली अॅशेज सिरीज

ऑस्ट्रेलियाने पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात इंग्लंडला १४६ धावांनी पराभूत करत पाच सामन्यांची अॅशेज मालिका ४-० ने आपल्या नावे केली. शेवटच्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियन संघाने इंग्लंडसमोर २७१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. पण या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ १२४ धावांवरच ऑल ऑऊट झाला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत कॅमरून ग्रीन, स्कॉट बोलॅंड, पॅट कमिन्सने प्रत्येकी ३ विकेट्स घेतले. अवघ्या ५६ धावांमध्ये इंग्लंडच्या संघाने १० विकेट्स गमावले. त्याधी ६८ धावांवर बिनबाद अशी इनिंगची सुरूवात इंग्लंडने केली होती.

ऑस्ट्रेलियाने या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करत पहिल्या इनिंगमध्ये ३०३ धावा केल्या होत्या. या सामन्यात इंग्लंड पहिल्या इनिंगमध्ये १८८ धावाच करू शकली. त्यानंतर १५५ च्या लीडने फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने आणखी १५५ धावांची भर त्यामध्ये घातली. इंग्लंड फलंदाजीला आल्यानंतर सुरूवातीला हे लक्ष्य छोटे आहे, असे वाटू लागले होते. इंग्लंडच्या संघाने बिनबाद ६८ धाला केल्या. पण इंग्लंडच्या संघाने १५० धावाही केल्या नाही. या सामन्यात शतक झळकावणाऱ्या ट्रेविस हेडला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला. तर एकुणच मालिकेत ५९ पेक्षा अधिकच्या सरासरीने ३५७ धावा केल्यासाठी मॅन ऑफ द सिरीज पुरस्कारानेही गौरविण्यात आले.

तिसऱ्या दिवशी १७ विकेट्स

मॅचच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया अशा दोन्ही संघाकडून तब्बल १७ विकेट्स घेण्यात आल्या. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या इनिंगमध्ये ३७ धावांवर ३ विकेट्सपासून इनिंगला सुरूवात केली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा पूर्ण संघ १५५ धावावंर ऑल आऊट झाला. विकेटकीपर बॅट्समन एलेक्स करीने सर्वाधिक ४९ धावा केल्या. इंग्लंडच्या जलदगती गोलंदाज मार्क वुडने ३७ धावांमध्ये ६ विकेट्स घेतले. तर स्टुअर्ट ब्रॉडला ३ विकेट्स मिळाले.


 

First Published on: January 16, 2022 6:26 PM
Exit mobile version