wrestling : बजरंग पुनिया आणि रवी दहियाला लवकरच विदेशी कोचची साथ

wrestling : बजरंग पुनिया आणि रवी दहियाला लवकरच विदेशी कोचची साथ

टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक विजेते पैलवान बजरंग पुनिया आणि रवी दहियाला लवकरच नव्या विदेशी प्रशिक्षकांची साथ मिळणार आहे. यासोबतच बजरंग आणि त्याचे जुने जॉर्जियन प्रशिक्षक शाको बेंटीनिड्स यांच्यात दुरावा येणार आहे. भारतीय कुस्ती महासंघाला बजरंग शाकोच्या जागी नवा प्रशिक्षक शोधायचा होता त्याला आता बजरंगने देखील पसंती दाखवली आहे. कुस्ती महासंघाने युक्रेनच्या एका प्रशिक्षकासोबत चर्चा केली होती पण याच्यावर अद्याप निर्णय झाला नाही. तर राष्ट्रीय चॅम्पियनशिप नंतर रवी दहियाच्या प्रशिक्षकावर निर्णय होणार आहे.

रवी दहियाला ऑलिम्पिकपूर्वी रशियन प्रशिक्षक कमल मलिकोव्ह प्रशिक्षक देत होते तर टोकियो ऑलिम्पिकमध्ये कास्ंय पदकापासून मुकलेल्या दीपक पुनियाला मुराद गायदोरोव प्रशिक्षण देत होते. पण ऑलिम्पिकमध्ये मुराद यांनी एका पंचाशी केलेल्या वादग्रस्त व्यवहारावरून वाद निर्माण झाला होता. मुराद यांच्या वादावरून कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंग यांना बदनामीचा सामना करावा लागला होता. याच्यानंतरच निर्णय घेतला होता की मुराद यांना पुढे अनुमती दिली नाही पाहिजे. पण माहितीनुसार कुस्ती संघाला देखील रवीसाठी नवीन विदेशी प्रशिक्षक पाहिजे आहे. दरम्यान राष्ट्रीय चॅम्पियनशिपनंतर रवीच्या नवीन विदेशी प्रशिक्षकाबाबत निर्णय होणार आहे.

कुस्ती संघाने वेगळे होण्याचा दिला सल्ला

रिओ ऑलिम्पिकपासून शाको बजरंगला प्रशिक्षण देत आले आहेत. पण कुस्ती महासंघ त्यांच्या प्रशिक्षकाच्या कामगिरीवर समाधानी नव्हता. संघाकडून कित्येक वेळा सांगण्यात आले की शाको यांच्याकडून बजरंगच्या पायाचे रक्षण करण्यावर काही खास काम करण्यात आले नाही. दरम्यान बजरंगला कुस्ती संघाने शाकोंपासून वेगळे होण्याच सल्ला दिला आहे. मात्र त्याने टोकियो ऑलिम्पिक पर्यंत शाको यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. पण आता परिस्थिती बदलली आहे.

 

First Published on: November 22, 2021 5:32 PM
Exit mobile version