बांगलादेशची भारतावर मात, मालिकेत मिळवली 1-0 ची आघाडी

बांगलादेशची भारतावर मात, मालिकेत मिळवली 1-0 ची आघाडी

भारत आणि बांगलादेश यांच्यात एकदिवसीय मालिकेला सुरूवात झाली आहे. पहिली मालिका ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळवण्यात आला. यावेळी बांगलादेशने भारतावर दणदणीत विजय मिळवत 1-0 अशी आघाडी मिळवली आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने बांगलादेशसमोर 187 धावांचे लक्ष्य ठेवले होते. परंतु बांगलादेशने 46 ओव्हर्समध्ये नऊ गडी गमावून लक्ष्य गाठले.

तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशने भारताचा अवघ्या एका विकेटने पराभव केला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ 41.2 ओव्हर्समध्ये 1 धावांवर गारद झाला. केएल राहुलने सर्वाधिक 73 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशने 9 गड्यांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य गाठले.

सलामीवीर शिखर धवन (7) आणि रोहित शर्मा (27) धावा करुन बाद झाले. विराटही 9 धावा करुन तंबूत परतला. श्रेयस आणि केएल राहुल यांनी काही काळ डाव सावरला. वॉशिंग्टन सुंदरही 19 धावा करुन तंबूत परतला. केएल राहुलने अर्धशतक पूर्ण केलं. त्याच्या 73 धावांच्या जोरावर भारत 186 धावांपर्यंत पोहचू शकला. राहुलने 70 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकार ठोकत 73 धावा केल्या.

187 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ एकवेळ सामना गमावेल असे वाटत होते. मात्र, यानंतर भारतीय संघाने मैदानावर काही चुका केल्या आणि सामना हातातून निसटला. मिराज आणि मुस्तफिझूर रहमान यांनी शेवटच्या विकेटसाठी नाबाद 51 धावांची भागीदारी रचली आणि संघाला विजय मिळवून दिला.


हेही वाचा : IND vs BAN : शमीच्या जागी आता ‘या’ वादळी गोलंदाजाला संधी; बांगलादेशच्या फलंदाजांसमोर मोठं आव्हान


 

First Published on: December 4, 2022 9:24 PM
Exit mobile version