IND vs BAN : शमीच्या जागी आता ‘या’ वादळी गोलंदाजाला संधी; बांगलादेशच्या फलंदाजांसमोर मोठं आव्हान

भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे. भारत आणि बांगलादेश यांच्या वनडे मालिका होणार आहे. मात्र या मालिकेपूर्वीच भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. संघातील जलद गोलंदाज मोहम्मद शमीला दुखापत झाली आहे. सराव सत्रात शमीच्या खाद्याला दुखापत झाली.

भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे. भारत आणि बांगलादेश यांच्या वनडे मालिका होणार आहे. मात्र या मालिकेपूर्वीच भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. संघातील जलद गोलंदाज मोहम्मद शमीला दुखापत झाली आहे. सराव सत्रात शमीच्या खाद्याला दुखापत झाली. या दुखापतीमुळे शमी आगामी वनडे मालिकेत खेळू शकणार नाही. परंतु, शमीच्या जागी भारतीय संघाने जलद गोलंदाज उमरान मलिक याची वनडे मालिकेसाठी निवड केली आहे. त्यामुळे आता बांगलादेशच्या फलंदाजांसमोर उमरान मलिकचे आव्हान असणार आहे. (India Vs Bangladesh Odi Umran Malik To Replace Shami In India Squad)

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यापूर्वी सुरू असलेल्या सराव सत्रात मोहम्मद शमीला दुखापत झाली. त्याच्यावर सध्या बेंगळुरू येथील नॅशनल क्रिकेट अकादमीत बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमकडून उपचार सुरू आहेत. या दुखापतीमुळे शमी आगामी वनडे मालिका खेळू शकणार नाही. नुकत्याच झालेल्या न्यूझीलंड दौऱ्यात त्याला विश्रांती देण्यात आली होती. मात्र शमीच्या जागी बीसीसीआयने जलद गोलंदाज उमरान मलिक याची वनडे मालिकेसाठी संघात निवड केली आहे.

उमराने मलिकने न्यूझीलंड दौऱ्यात वनडेत पदार्पण केले होते. दोन डावात त्याने ३ विकेट घेतल्या. या दोन सामन्यात त्याने १५० किमीच्या वेगाने चेंडू टाकला होता. २३ वर्षीय मलिकला बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतून वगळण्यात आले होते. मात्र आता शमीच्या दुखापतीमुळे त्याला संधी मिळाली आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात ४ डिसेंबरपासून वनडे मालिका सुरू होत आहे. दुसरी मॅच ७ तर तिसरी १० डिसेंबर रोजी होणार आहे.

मोहम्मद शमी वनडे मालिकेतून बाहेर झाला आहे. मात्र तो बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत देखील खेळण्याची शक्यता कमी आहे. वनडे मालिकेनंतर १४ डिसेंबरपासून दोन्ही संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. कसोटी चॅम्पियनशिप फायनलच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला पुढील सर्व कसोटी जिंकाव्या लागणार आहेत.

भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत, इशान किशन, शाहबाज अहमद, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक


हेही वाचा – किरॉन पोलार्ड बनणार मुंबई इंडियन्सचा कर्णधार, तर राशिदलाही दिलं मोठं गिफ्ट