स्वदेशी क्रिकेटर्सची चांदी, BCCIकडून सामन्याच्या मानधनात भरमसाठ वाढ

स्वदेशी क्रिकेटर्सची चांदी, BCCIकडून सामन्याच्या मानधनात भरमसाठ वाढ

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डने (BCCI)स्वदेशी क्रिकेट खेळाडूंच्या मानधनात भरमसाठ वाढ केली आहे. सोमवारी झालेल्या अपेक्स काऊन्सिलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या खेळाडूंनी स्वदेशी क्रिकेट सामन्यात ४० हून अधिक सामने खेळले आहेत त्यांच्या मानधनात ६० हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

तर २३ वर्ष वयोगटाच्या आतील खेळांडूंच्या मानधनात २५ हजार रुपये आणि १९ वर्षाखालील खेळाडूंच्या मानधनात २० हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय BCCIने घेतला आहे. त्याचबरोबर गेल्या सामन्यातील मानधनातील तफावतीची रक्कमही भरून मिळणार आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे रणजी ट्रॉफी सामने रद्द करण्यात आले होते. यापार्श्वभूमीवर बोर्डाने सर्व क्रिकेट्र्सला ५० टक्के नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या रणजी ट्रॉफीमध्ये खेळणाऱ्या खेळाडूला रोज ३५ हजार रुपये आणि १.४ लाख रुपये प्रत्येक सामन्यासाठी मानधन दिले जाते. यापार्श्वभूमीवर बोर्ड खेळाडूंना नुकसान भरपाईपोटी ७० हजार रुपये देणार आहे.


हेही वाचा :  कोहलीनंतर RCB चे नेतृत्व कोणाकडे ? विराटचा कर्णधारपदाचा राजीनामा


 

First Published on: September 20, 2021 6:05 PM
Exit mobile version