इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया घोषणा

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया घोषणा

BCCI announcement Team india for Test match against England

इंग्लडमध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी पुढच्या महिन्यात टीम इंडिया इंग्लंडला रवाना होणार आहे. या कसोटी सामन्यासाठी टीम इंडायाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ कोसोटी सामना खेळणार आहे. इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाला एकच कसोटी सामना खेळायचा आहे. हा सामना मागच्यावर्षी कोरोनामुळे बाकी राहिला होता. BCCI ने 17 सदस्यांच्या टीमची घोषणा केली आहे.

टीममध्ये बदल नाही –

कसोटी संघात कुठलाही मोठा बदल करण्यात आलेला नाही. मयंक अग्रवालला संघातून डच्चू देण्यात आला आहे. या कसोटी सामन्यात सलामीची जबाबदारी कॅप्टन रोहित शर्मासोबत केएल राहुल संभाळणार आहे. तर बॅकअप ओपनर म्हणून शुभमन गिलचा समावेश करण्यात आला आहे.

चेतेश्वर पुजाराची निवड –

चेतेश्वर पुजाराने संघात पुन्हा निवड करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिका दौरा आणि त्याआधीच्या खराब कामगिरीमुळे चेतेश्वर पुजारा संघातून वगळण्यात आले होते. श्रीलंके विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याची संघात निवड झाली नव्हती. पण आता इंग्लंड विरुद्धच्या कसोटीसाठी त्याची निवड झाली आहे. त्याची टीम इंडियात निवड होईल, अशी अपेक्षा होती. निवड समितीच्या सदस्याने तसे संकेतही दिले होते. अखेर त्याची टीम इंडियाच्या कसोटी संघात निवड झाली आहे.

First Published on: May 22, 2022 7:46 PM
Exit mobile version