जगातील सर्वात श्रीमंत क्रीकेट बोर्ड; तरी खेळाडू १० महिने पगाराविना

जगातील सर्वात श्रीमंत क्रीकेट बोर्ड; तरी खेळाडू १० महिने पगाराविना

भारतीय क्रिकेट नियमाक मंडळ जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेक बोर्ड असल्याचं सांगितलं जातं. आयपीएल सारखी महागडी स्पर्धा BCCI कडून भरवली जाते. मात्र नाव मोठं लक्षण खोटं असलेल्या बीसीसीआयने मागच्या १० महिन्यांपासून आपल्या खेळाडूंना पगारच दिला नसल्याचे समोर आले आहे. बीसीसीआयने करारबद्ध केलेल्या २७ खेळाडूंना मागच्या वर्षीच्या ऑक्टोबरपासून पगार आणि सामना शुल्क मिळलेले नसल्याची माहिती बाहेर आली आहे. इंडियन एक्सप्रेसने यासंबंधीची बातमी दिली आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ खेळाडूंशी रितसर करार करत असते. तसेच खेळाडूंच्या ग्रेड ठरवून त्यानुसार त्यांना मानधन देण्यात येत असते. अ+, अ, ब आणि क या चार ग्रेडमध्ये मानधन देण्यात येत असते. वर्षातून चार वेळा प्रत्येक तिमाहीत खेळाडूंना त्यांचे मानधन वितरीत केले जाते. २७ खेळाडूंना शेवटचे मानधन ऑक्टोबर महिन्यात मिळालेले आहे. त्यानंतर डिसेंबर महिन्यात भारतीय संघाने २ कसोटी, ९ वनडे आणि ८ टी-२० सामने खेळले आहेत. या सामन्यांचे शुल्क देखील बीसीसीआयने अद्याप दिलेले नाही.

बीसीसीआयकडून थकलेल्या वेतनाची रक्कम आता ९९ कोटी इतकी झाली आहे. यामध्ये अ+ ग्रेडच्या खेळांडूना वर्षाला ७ कोटी (विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह) द्यायचे आहेत. तर अ ग्रेडसाठी ५ कोटी, ब साठी ३ तर क ग्रेडसाठी १ कोटी इतके मानधन द्यायचेआहे. याव्यतिरिक्त डिसेंबरमध्ये खेळलेल्या सामन्यांचे वेतन म्हणून प्रत्येक खेळाडूला ग्रडेनुसार १५ लाख, ६ लाख आणि ३ लाख असे शुल्क द्यायचे आहे.

First Published on: August 2, 2020 12:23 PM
Exit mobile version