भुवनेश्वरची चमकदार खेळी, गोलंदाजीच्या जोरावर एकाच सामन्यात रचले मोठे विक्रम

भुवनेश्वरची चमकदार खेळी, गोलंदाजीच्या जोरावर एकाच सामन्यात रचले मोठे विक्रम

भुवनेश्वरची चमकदार खेळी, गोलंदाजीच्या जोरावर एकाच सामन्यात रचले मोठे विक्रम

भारतीय गोलंदाज भुवनेश्वरचे एकाच सामन्यात अनेक विक्रम मोडित काढून आपल्या नावे अनेक विक्रमांची नोंद केली आहे. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध सुरु असलेल्या पाच सामन्याच्या टी-२० सीरीजमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. परंतु भारताचा गोलंदाज भुवनेश्वर कुमारने दोन सामन्यात १३ धावा देत ४ विकेट घेतले आहेत. भुवनेश्वरने आफ्रिकेच्या संघाला टक्कर देण्यात कसर सोडली नाही. आपल्या गोलंदाजीच्या जोरावर भुवनेश्वरने अनेक रिकॉर्ड आपल्या नावे केले आहेत.

भारतीय संघाचा स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमारने टी२० क्रिकेटमध्ये आपला सर्वश्रेष्ठ प्रदर्शनचा विक्रम मोडित काढला आहे. यापूर्वी भुवनेश्वरने डेब्यू सामन्यात पाकिस्तानविरुद्ध ९ धावा देत ३ विकेट घेतले होते. तसेच टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा भारतातील दुसरा गोलंदाज ठरला आहे. भुवनेश्वरने आर अश्विनचा विक्रम मोडित काढला आहे.

भुवनेश्वर कुमारने ६१ टी-२० सामन्यात ६३ विकेट घेतल्या आहेत. युजवेंद्र चहलने आतापर्यंत ६९ विकेट घेतल्या आहेत. या दोन्ही गोलंदाजांच्या मागे जसप्रीत बुमराह ६२ विकेट घेत आहे. त्याचवेळी आर अश्विन ६१ विकेट्ससह चौथ्या क्रमांकावर कायम आहे.

तसेच भुवनेश्वर भारतातील पहिला गोलंदाज आहे. त्याने टी-२० क्रिकेटमध्ये ३ डावात ४ पेक्षा जास्त विकेट घेतले आहेत. भारताचा कोणताही वेगवान गोलंदाज एकाच डावात चारपेक्षा जास्त विकेट घेऊ शकला नाही.

एवढेच नाही तर भुवनेश्वर कुमारने टी-20 क्रिकेटमध्ये ५० व्या डावातील पहिले षटक टाकले असून त्याच्या नावे हा सुद्धा विक्रमक नोंद झाला आहे. बिलाल खानने T20 क्रिकेटमध्ये 43 वेळा डावातील पहिले ओव्हर टाकले आहे. मिचेल स्टार्कने हा पराक्रम ३८ वेळा केलाय.


हेही वाचा : अफगाणिस्तानच्या फूटबॉलपटू कडून भारतीय खेळाडूंना मारहाण

First Published on: June 13, 2022 12:47 PM
Exit mobile version