IPL 2020 : भुवनेश्वर कुमार स्पर्धेतून आऊट 

IPL 2020 : भुवनेश्वर कुमार स्पर्धेतून आऊट 

भुवनेश्वर कुमार

सनरायजर्स हैदराबाद संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा प्रमुख वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला पायाला झालेल्या दुखापतीमुळे उर्वरित आयपीएल स्पर्धेत खेळता येणार नाही. भुवनेश्वरला २ ऑक्टोबरला झालेल्या चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी करताना ही दुखापत झाली होती. ही दुखापत किती गंभीर आहे याबाबत सुरुवातीला काहीही सांगितले गेले नाही. मात्र, त्याची ही दुखापत गंभीर असून आता त्याला उर्वरित स्पर्धेला मुकावे लागणार असल्याचे सोमवारी सांगण्यात आले.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यालाही मुकावे लागणार?

पायाला झालेल्या दुखापतीमुळे भुवनेश्वर कुमारला उर्वरित आयपीएलमध्ये खेळता येणार नाही. त्याची ही दुखापत ग्रेड २ किंवा ३ ची आहे. त्यामुळे त्याला साधारण सहा ते आठ आठवडे मैदानाबाहेर राहावे लागू शकेल. यावर्षाच्या अखेरीस भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यातही भुवनेश्वर खेळण्याबाबत साशंकता आहे, असे बीसीसीआयच्या एका सिनियर अधिकाऱ्याने सांगितले. भुवनेश्वरने यंदाच्या मोसमाची चांगली सुरुवात केली होती. त्याला चार सामन्यांत तीन विकेट घेण्यात यश आले होते. तसेच त्याचा इकनॉमी रेट ७ पेक्षाही कमी होता. त्याला मागील काही काळात दुखापतींनी सतावले आहे.

First Published on: October 5, 2020 8:34 PM
Exit mobile version