बिपिन फुटबॉल शिबीर ४ नोव्हेंबरपासून

बिपिन फुटबॉल शिबीर ४ नोव्हेंबरपासून

बिपिन फुटबॉल शिबीर

बिपिन फुटबॉल अकादमीच्या ३२ व्या मोफत प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन रविवार, ४ नोव्हेंबर रोजी होणार आहे. हे उदघाटन कर्नाटक स्पोर्टिंग असोसिएशनच्या मैदानावर सकाळी ७.३० वाजता होईल. हे शिबीर १६ वर्षांखालील मुलामुलींसाठी असेल. त्यामुळे जे खेळाडू १ जानेवारी २००३ नंतर जन्मलेले आहेत, तेच या शिबिरात सहभागी होऊ शकतील.

आठ केंद्रांवर शिबिरांचे आयोजन

या शिबिरांचे आयोजन एकाचवेळी कुलाबा-चर्चगेट, बीएमसी कॅम्प बॅकबे, विरार, कल्याण, कांदिवली, उल्हासनगर, विलेपार्ले आणि मिरा रोड अशा आठ केंद्रांवर करण्यात आले आहे. या शिबिरांमध्ये तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी मुलांना आपले कौशल्य आजमावता येईल. या शिबिरांनंतर डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात बिपिन फुटबॉल अकादमीची आंतरकेंद्र स्पर्धा होणार आहे.

शिबिरासाठी येथे संपर्क साधावा

बीएमसी कॅम्प : ओव्हल मैदान, प्रमुख प्रशिक्षक : स्टीव्हन डायस, माजी भारतीय खेळाडू.
शिबीर संचालक : सालु डीसुझा ७५०६१८४९९०.
मिरा रोड : शांती नगर, सेक्टर १०, मुख्य प्रशिक्षक : थॉमस टॉबीज.
शिबीर संचालक : अमित बागवान ९८९२८०९३४५.
विलेपार्ले : दुभाषी रोड, गुजरात सोसायटी, मुख्य प्रशिक्षक : रणजीत मटकर.
शिबीर संचालक : सिद्धार्थ सबापती : ७७३८४५०४३१.
उल्हासनगर : बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल, मुख्य प्रशिक्षक : मोनाप्पा मूल्या.
शिबीर संचालक : श्याम खरात ८०८०९०६२६२.
कुलाबा-चर्चगेट : बॅक गार्डन, कुलाबा, मुख्य प्रशिक्षक : बॉस्को मार्टिन.
शिबीर संचालक : सुधाकर राणे ९३२२८२३०३५.
विरार : पुरापाडा ग्राऊंड, विरार (प.), मुख्य प्रशिक्षक : एमॅन्युएल.
शिबीर संचालक : रुडॉल्फ स्कुबा ८३९०८९६८९८.
कांदिवली : कमल विहार स्पोर्टस ग्राऊंड, कांदिवली (प.), मुख्य प्रशिक्षक : हरीश राव.
शिबीर संचालक : शेफाली राणे ९८९२५३३५५५.
कल्याण : सेंच्युरी रेयॉन, शहाड, मुख्य प्रशिक्षक : थॉमस  कॅस्टेलिनो.
शिबीर संचालक : तिरथ सिंग ८१४९३४४९९९.
First Published on: October 30, 2018 3:30 AM
Exit mobile version