FIFA 2018 : आज बाद फेरीचा तिसरा दिवस

FIFA 2018 : आज बाद फेरीचा तिसरा दिवस

फिफा विश्वचषक २०१८

फुटबॉल विश्वचषकातील बाद फेरीचे सामने रंगतदार सुरू असून मोठे-मोठे संघ बाहेर जाताना दिसत आहेत आधी मेस्सी आणि रोनाल्डोचा संघ तर कालच्या सामन्यातून बलाढ्य स्पेन संघांच्या बाहेर जाण्याने सर्वानाच धक्का बसला आहे. आजही काही बलाढ्य तर काही छोट्या संघांत सामने होणार आहेत. ज्यात ब्राझीलविरूद्ध मेक्सीको आणि जपानविरूद्ध बेल्जियम हे सामने रंगणार आहेत.

‘इ’ गटातून ७ गुणांसह बाद फेरीत आलेल्या ब्राझील संघांला आज गतविजेत्या जर्मनीला नमवणाऱ्या मेक्सीकोच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री ७.३० ला हा सामना सुरु होणार आहे. ब्राझीलने आतापर्यंत सर्वाधिक ५ वेळा विश्वचषक जिंकला असला तरी देखील मागील काही विश्वचषक ब्राझील खास कामगिरी करू शकला नाहीये, त्यामुळे आजच्या सामन्यावरून ब्राझीलचा यावर्षीचा कपमधील पुढचा प्रवास अवलंबून असेल. तर दुसरीकडे मेक्सीकोने आपल्या पहिल्याच सामन्यात गतविजेत्या जर्मनीला १-० ने धुळ चारली. त्यांचा आतापर्यंतचा विश्वचषकातील प्रवास उत्तम असून आज ब्राझीलसाठी मेक्सीकोचे आव्हान अवघड असणार हे नक्की.

यानंतरचा सामना बेल्जियम आणि जपान यांच्यात होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार ११.३० ला सुरू होणार आहे. यावर्षीच्या विश्वचषकात बेल्जियमने आतापर्यंत एकही सामना हरला नसल्याने त्यांचे आजच्या सामन्यात पारडे जड आहे. तर जपानकडे केवळ ४ गुण असतानाही ‘फेअर प्ले’ च्या गुणांवर त्यानी बाद फेरी गाठली. त्यामुळे आज जपानसाठी विजय मिळवणे अवघड असणार आहे. जपान संघांची मदार त्यांचा स्टार प्लेअर कागावा याच्यावर असणार आहे तर बेल्जियमकडे हॅझार्ड, रोमेलू लुकाकू, केव्हिन डे ब्रुयने या सारख्या अप्रतिम खेळाडूंची फौजच आहे.

जपानला लागली ‘फेअर प्ले’ची लॉटरी; सरस गुणसंख्येवर बाद फेरीत प्रवेश!

First Published on: July 2, 2018 3:45 PM
Exit mobile version