घरक्रीडाजपानला लागली 'फेअर प्ले'ची लॉटरी; सरस गुणसंख्येवर बाद फेरीत प्रवेश!

जपानला लागली ‘फेअर प्ले’ची लॉटरी; सरस गुणसंख्येवर बाद फेरीत प्रवेश!

Subscribe

एच गटातून जपान आणि कोलंबिया बाद फेरीत, तर सेनेगल आणि पोलंड यांचे या विश्वचषकातील आव्हान संपुष्टात!

फिफा विश्वचषकात सहभागी झालेल्या ३२ देशांपैकी १६ संघ बाद फेरीत पोहोचले आहेत. गुरूवारी झालेल्या एच गटातील सामन्यातून जपान आणि कोलंबिया हे दोन संघ बाद फेरीत दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे एच गटातील जपान आणि सेनेगल या दोन्ही संघाचे गुण आणि गोल फरकाची संख्या समान असून देखील जपान आपल्या फेअर गेममुळे बाद फेरीत पोहोचला आहे. तर दुसरीकडे कोलंबियाने सेनेगलला १-० ने पराभूत करत ६ गुणांनी बाद फेरी गाठली आहे. सेनेगल आणि पोलंड यांचे या विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले आहे.

जपानविरुद्ध पोलंड सामन्यात हाफ टाईमपर्यंत दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. या नंतर सामन्याच्या उत्तरार्धात जपानकडून काही आक्रमणं करण्यात आली. मात्र पोलंडच्या उत्कृष्ट बचावापुढे जपानची डाळ शिजली नाही. त्यानंतर ५९ व्या मिनिटाला पोलंडकडून बेड्नारेकने गोल केला आणि सामन्यात पोलंडला आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर दोन्ही संघांचा एकही गोल झाला नाही आणि जपानच्या संघांला पोलंडने १-० च्या फरकाने पराभूत केले. त्यामुळे सामन्या अखेर जपानकडे गुणतालिकेत ४ गुण होते. तर दुसरीकडे सेनेगलचेही ४ गुण होते. विशेष म्हणजे दोन्ही संघांची गोल संख्या ही समान होती. त्यामुळे दोघातील कोण बाद फेरीत जाणार? हा प्रश्न होता. मात्र ‘फेअर प्ले’ मुळे जपानला बाद फेरीत जाण्याची संधी मिळाली आहे.

- Advertisement -
japan vs poland
जपानविरूद्ध पोलंड सामन्यातील एक क्षण

‘फेअर प्ले’ म्हणजे काय?

‘फेअर प्ले’ म्हणजे एखादा संघ खेळकर वृत्तीने खेळला असल्यास त्यांना ‘फेअर प्ले’ चे गुण दिले जातात. जपानला सेनेगलच्या तुलनेत कमी ‘यलो कार्डस’ मिळाले आहेत. त्यामुळे त्याचा फायदा जपानला मिळाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -