विराट कोहली बंगळुरूमध्ये खेळणार १०० वा कसोटी सामना

विराट कोहली बंगळुरूमध्ये खेळणार १०० वा कसोटी सामना

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली जोहान्सबर्ग येथील वॉन्डरर्स मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सुरू असलेला दुसरा कसोटी सामना खेळत नाही. त्याच्या जागेवर केएल राहुल टीम इंडियाचं नेतृत्त्व करत आहे. विराटचा हा ९९ वा कसोटी सामना होता. परंतु तो आता खेळत नाहीये. त्यामुळे आता तो केपटाऊनमध्ये ९९ वा कसोटी सामना खेळेल. दक्षिण आफ्रिकेत कसोटी न खेळल्यामुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाणं आलं आहे. तर बीसीसीआयच्या मतभेदामुळे कोहली सामन्यातून बाहेर पडल्याची चर्चा जोरदार रंगत आहे.

विराट कोहली भारतात १०० वा कसोटी सामना खेळणार

११ जानेवारीपासून केपटाऊनमध्ये तिसऱ्या कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे. विराट आजचा सामना खेळला असता तर ही त्याची १०० वी कसोटी ठरली असती. परंतु विराट कोहली भारतात १०० वा कसोटी सामना खेळणार असल्याचं सांगितलं जात आहे. विराट पाठदुखीमुळे सामन्यातून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी टीम इंडियाचा वेगवान फलंदाज हनुमा विहारीला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे. विराटच्या पाठीमागील वरच्या भागात क्रॅम्प आहे. त्यामुळे तो फिजिओच्या देखरेखेखाली उपचार घेत आहे. मात्र, तो पुढच्या कसोटी सामन्यापर्यंत बरा होईल, असं केएल राहुलने सांगितलं.

विराट कोहलीचे हे फेव्हरिट मैदान

विराट कोहलीचे हे फेव्हरिट मैदान आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याला अनेक विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी आहे. शिवाय ७१ वा आंतरराष्ट्रीय शतकाचा दुष्काळही तो इथेच संपवेल, अशा विश्वास टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी पत्रकार परिषदेतून व्यक्त केला आहे. परंतु द्रविड यांना पत्रकार परिषदेत विराटच्या गैरहजेरीबाबत विचारलं असता, त्यांनी विराट आपल्या १०० व्या कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येवर माडियाशी बोलणार असल्याचं सांगितलं आहे.


हेही वाचा : Mohammad Hafeez Retires : मोहम्मद हाफीजचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा, चाहत्यांना धक्का


 

First Published on: January 3, 2022 7:37 PM
Exit mobile version