घरक्रीडाMohammad Hafeez Retires : मोहम्मद हाफीजचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा, चाहत्यांना धक्का

Mohammad Hafeez Retires : मोहम्मद हाफीजचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा, चाहत्यांना धक्का

Subscribe

पाकिस्तानच्या क्रिकेट क्षेत्रातून मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे पाकिस्तानचा अष्टपैलू मोहम्मद हाफीजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मागील १८ वर्षांपासून हाफीज आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. परंतु त्याने आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलिवदा केलं आहे. त्यामुळे आता मोहम्मद हाफीज पाकिस्तानच्या वनडे आणि टी-२० सामन्यात खेळताना दिसणार नाहीये. हाफीजने अचानकपणे निवृत्तीचा निर्णय घेतला आहे.

हाफीजच्या निर्णयामुळे चाहत्यांना मोठा धक्का

२०१८ मध्ये मोहम्मद हाफीजने लॉन्ग फॉरमॅट क्रिकेटला गुडबाय केलं होतं. त्यानंतर अधिक वेळेसाठी तो टीमच्या संघातून बाहेर देखील होता. हाफीजच्या या निर्णयामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतची माहिती दिली आहे.

- Advertisement -

काय आहे हाफीजची कारकीर्द ?

मोहम्मद हाफीजची कारकीर्द जवळपास दोन दशकांची राहिली आहे. त्याने पाकिस्तानसाठी ३९२ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने तब्बल १२ हजार ७८९ धावा केल्या आहेत. तर २५२ इतक्या गडी बाद केले आहेत. हाफीजने ५५ कसोटी सामने , २१८ वनडे आणि ११९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तसेच त्याने टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे.

- Advertisement -

२००३ मध्ये पदार्पण करणाऱ्या अष्टपैलू खेळाडूने २०२१ मधील नोव्हेंबरमध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकपमधील उपांत्य फेरीतील ऑस्ट्रेलियाविरूद्धचा शेवटचा सामना खेळला होता. तसेच त्याने ३२ सामनावीर पुरस्कार जिंकले आहेत. सर्वाधिक पुरस्कारांच्या यादीत पाकिस्तानमधून त्याचा चौथा क्रमांक लागतो. तर प्रथम क्रमांक शाहिद आफ्रिदीचा आहे. त्याने ४३ पुरस्कार जिंकल्याची नोंद आहे. तसेच वसीम अक्रम ३९ आणि इंझमाम-उल-हक ३३ यांचा देखील क्रमांक लागतो.


हेही वाचा : IND vs SA 2nd Test: वॉन्डरर्समध्ये पाच भारतीय क्रिकेटपटूंनी उडवला धुरळा, टॉपवर रनमशीन कोहली


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -