IPL मसाला! रोहित शर्माच्या फोटोवर चहलची फिरकी!

IPL मसाला! रोहित शर्माच्या फोटोवर चहलची फिरकी!

रोहित आणि रितिका शर्मा

क्रिकेटर्स मैदानावर षटकार- फटकार मारतात. त्याला सर्वच प्रेक्षक दाद देतात. कधी कधी मैदानाबाहेरही त्यांचे हटक अंदाज लोकांची वाहवा मिळवतात. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याचा अनुभव घेतो आहे. रोहितने सोशल मीडियावर नुकताच त्याच्या पत्नीसोबतचा एक फोटो शेअर केला. त्या फोटोखाली रोहितने असे काही लिहिले की, युजवेंद्र चहलने त्याची फिरकी घेतली.

फोटोमध्ये दोघांनीही सनग्लासेस घातले असून, रोहित रितिकाच्या सन ग्लासेसमध्ये दिसतो आहे. फोटोखाली रोहितने मी या डोळ्यात आपल्या दोघांचा आज, उद्या आणि येणारा भविष्य पाहू शकतो. यानंतर चहलने फोटोवर कमेंट करून रोहितची फिरकी घेत लिहिले. रोहित भय्या हे डोळे नाहीत ग्लासेस आहेत. चहलच्या या कमेंटवर रोहितने आपल्या भावनांना सावरत यस राइट ग्लासेसच्या माध्यमातून, असे उत्तर दिले.

रोहित आणि चहलच्या सोशल मीडियावरील कमेंट वॉरमुळे आयपीएल स्पर्धेतील खेळाडूंमधील परस्परविरोधी भावना काही काळासाठी बाजूला सारल्या गेल्या, शिवाय स्पर्धेचा ताणही कमी झाला.

First Published on: May 10, 2018 11:03 AM
Exit mobile version