या कारणांमुळे केदार जाधव झाला संघाबाहेर

या कारणांमुळे केदार जाधव झाला संघाबाहेर

केदार जाधव

वेस्टइंडीज संघाविरोधात खेळल्या जाणाऱ्या तीन वनडे सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची यादी प्रकाशित करण्यात आली. या यादीत खेळाडू केदार जाधव याचे नाव नव्हते. या बद्दल केदार जाधव याला विचारले असता त्याने याबद्दल काहीच माहिती नसल्याची प्रतिक्रिया दिली. टीममध्ये निवड न झाल्याने केदार निराश होता. मात्र आता केदारला टीममध्ये न घेण्याचे खरे कारण समोर आले आहे. भारताच्या मुख्य निवडकर्ता एमएसके प्रसाद यांनी जाधवला न घेण्या मागचे कारण सांगितले आहे.

टीममध्ये न घेण्याचे कारण

प्रसाद यांनी सांगितल्याप्रमाणे जाधव हा मेडिकलमध्ये अनफिट असल्यामुळे त्याची निवड करण्यात आली नाही. टीमध्ये येण्याअगोदर जाधव फिट होता मात्र टीममध्ये आल्यानंतर जाधव अनफिट झाला. जर भारतीय टीम देवधर ट्रॉफी जर जिंकली तर यानंतर आणखी एक सामना होणार आहे. यानंतर जाधव जर मेडिकलमध्ये योग्य ठरला तर त्याला चौथ्या वनडेमध्ये खेळता येईल.

महत्वाचा खेळाडू

केदार जाधव भारतीय टीममध्ये फलंदाजी करतो. मागील काही वनडेमध्ये त्याने चांगले प्रदर्शन केले होते. मात्र पुढील वर्षी इंग्लड दौऱ्यामध्ये जाधव हा महत्वाचा खेळाडू ठरू शकतो. त्याला टीमध्ये पुन्हा कधी घेतले जाणार असल्याचे सांगितल्या जात आहे.

First Published on: October 26, 2018 5:05 PM
Exit mobile version