Halal Meat : भारतीय खेळाडूंना मांसाहाराची सक्ती, नव्या वादाला तोंड फोडल्याने BCCI ट्रोल

Halal Meat : भारतीय खेळाडूंना मांसाहाराची सक्ती, नव्या वादाला तोंड फोडल्याने BCCI ट्रोल

न्यूझीलंडविरूध्दच्या ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत मिळवलेल्या मोठ्या विजयानंतर भारतीय संघ आता २ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी तयारी करत आहे. मालिकेचा पहिला सामना कानपूरमध्ये २५ नोव्हेंबरला म्हणजेच गुरूवारी होणार आहे. मात्र मालिकेला सुरूवात होण्यापूर्वीच एक नवा वाद सुरू झाला आहे. भारतीय खेळांडूच्या आहारात मांसाहाराची सक्ती केल्यानंतर सोशल मीडियावर भारतीय क्रिकेट बोर्डाला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. लक्षणीय बाब म्हणजे बीसीसीआयकडून अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. मात्र सोशल मीडियावर याच्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बीसीसीआयद्वारे कानपूर कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला खेळांडूच्या तयारीसाठी त्यांच्या आहारात मांसाहाराची सक्ती केल्यानंतर सोशल मीडियावर भारतीय क्रिकेट बोर्डावर सर्वच बाजूंनी टीका टिप्पणी होत आहे. या सक्तीच्या विरोधात मंगळवारी दिवसभर ट्विटरवर “बीसीसीआय प्रमोट्स हलाल’ हा हॅशटॅग ट्रेंड होत होता. माहितीनुसार बीसीसीआयने भारतीय खेळांडूना नवीन आहाराची सक्ती केली आहे आणि खेळांडूना त्याचे सक्तीने पालन करणे आवश्यक असून हलाल केलेल्या मांसास खाणे अनिवार्य असणार आहे.

माहितीनुसार बीसीसीआयने असेही म्हटले आहे की जर कोणाला मांस खायचे असेल तर ते फक्त हलाल मांस खाऊ शकतात. याच्याव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे हलाल मांस खाऊ शकत नाही. येणाऱ्या मालिकेसाठी आणि आयसीसीच्या स्पर्धांसाठी खेळांडूना तंदुरूस्त ठेवण्यासाठी त्यांच्या आहारावर नियोजन केले जात आहे. सोबतच खेळांडूचे वजन वाढू नये याची देखील काळजी घेतली जाणार आहे.

खेळांडू्च्या आहारात हलाल मांसाची सक्ती केल्याने सोशल मीडियावर चाहत्यांकडून मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे आणि सोबतच बीसीसीआयला प्रश्न विचारले जात आहेत. सोशल मीडियावर काही तासांच्या आतच १० हजारहून जास्त लोकांनी ट्विटरच्या माध्यमातून बीसीसीआयला प्रश्न विचारले. भारत इस्लामिक देश आहे का, जे खेळांडूच्या आहारात हलाल मांसाचा समावेश करत आहेत असा प्रश्न करत चाहत्यांनी बीसीसीआयवर निशाणा साधला. काही लोकांनी तर हलाल मांस फक्त मुस्लीमांसाठी असल्याचे म्हणत याची सक्ती हिंदूना केली जात आहे असे म्हटले.


हे ही वाचा: IND vs NZ Test series : खराब प्रदर्शनानंतर देखील रहाणेला, सचिन आणि कपिल देव यांना मागे टाकण्याची संधी


 

First Published on: November 23, 2021 5:25 PM
Exit mobile version