CSK vs RR: राजस्थानच्या गोलंदाजांचा रॉयल मारा; चेन्नईवर ७ गडी राखून विजय

CSK vs RR: राजस्थानच्या गोलंदाजांचा रॉयल मारा; चेन्नईवर ७ गडी राखून विजय

राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जला पराभव करत स्पर्धेतील त्यांचं आव्हान जिवंत ठेवलं आहे. चेन्नईच्या १२६ धावांच्या छोट्याश्या आव्हानाचा पाठलाग करताना ७ गडी राखून हा सामना जिंकला. या पराभवाने चेन्नईचा स्पर्धेतील पुढचा प्रवास अधिक कठीण होऊन बसला आहे. चेन्नईला स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर यापुढील सर्व सामने जिंकणं आवश्यक आहे. तर राजस्थानला देखील काहीसं तसंच समीकरण आहे.

चेन्नईच्या १२६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात चांगली नाही झाली. सलामीवीर रॉबिन उथप्पा स्वस्तात बाद झाला. त्यानंतर लगेचच बेन स्टोक्सला दीपक चहरने माघारी धाडलं. बेन स्टोक्सने ११ चेंडूत १९ धावा केल्या. यानंतर मैदानावर आलेला संजू सॅमसन तसाच तंबूत परतला. संजू सॅमसनला भोपळाही फोडता आला नाही. छोट्याशा लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान डाव सुरुवातील गडगडला. मात्र, कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि जॉस बटलरने आश्वासक फलंदाजी करत संघाला सावरलं. बटलरने ४८ चेंडूत ७८ धावा केल्या. यामध्ये ७ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. तर कर्णधार स्टीव्ह स्मिथने ३४ चेंडूत २६ धावा केल्या.

Abuनाणेफेक जिंकून चेन्नईने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु, त्यांच्या डावाची सुरूवात खराब झाली. सलामीवीर फाफ डु प्लेसिस १० धावांवर बाद झाला. शेन वॉटसनही ८ धावा काढून माघारी परतला. सॅम करनला चांगली सुरूवात मिळाली पण १ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने २२ धावा केल्यावर तो झेलबाद झाला. चांगल्या लयीत असलेला रायडू (१३ स्वस्तात बाद झाला. त्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि रविंद्र जाडेजा यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाला शंभरी पार करून दिली. १८व्या षटकात धोनी २८ धावांवर धावचीत झाला. अखेरीस रविंद्र जाडेजा (३५*) आणि केदार जाधव (४*) या दोघांनी संघाला २० षटकांत ५ बाद १२५ धावांपर्यंत मजल मारून दिली. श्रेयस गोपालने १४ धावांत १ बळी, राहुल तेवातियाने १८ धावांत १ बळी तर जोफ्रा आर्चरने २० धावांत १ बळी टिपत भेदक मारा केला.

First Published on: October 19, 2020 11:04 PM
Exit mobile version