Chess Candidates 2024 : 17 वर्षीय ग्रँडमास्टर डी. गुकेशने कॅन्डिडेट्स चेस स्पर्धा जिंकत रचला इतिहास

Chess Candidates 2024 : 17 वर्षीय ग्रँडमास्टर डी. गुकेशने कॅन्डिडेट्स चेस स्पर्धा जिंकत रचला इतिहास

मुंबई : भारताचा 17 वर्षीय ग्रँडमास्टर डॉ. गुकेशने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. गुकेशने कॅन्डिडेट्स चेस टुर्नामेंट जिंकल. हा सामना जिंकत गुकेशने इतिहास रचला आहे. डी. गुकेश हा जागतिक बुद्धीबळ स्पर्धा जिंकणारा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. ही स्पर्धा जिंकून त्याने डिंग लिरेन (चिनी ग्रँडमास्टर) याला आव्हान दिले आहे. डी. गुकेश हा भारताचा दिग्गज बुद्धीबळपटू विश्वनाथन आनंदनंतर कॅन्डिडेट्स बुद्धीबळ स्पर्धा जिंकणारा दुसरा भरतीय बुद्धीबळपटू ठरला आहे. (D Gukesh Won Chess Candidates 2024 Makes History By Becoming Youngest Ever World Championship Contender)

कॅन्डिडेट्स चेस टुर्नामेंट ही स्पर्धा जगज्जेत्या बुद्धीबळपटूला आव्हान देणारा खेळाडू निवडण्यासाठी आयोजित केली जाते. कॅन्डिडेट्स बुद्धीबळ स्पर्धेत गुकेशने अमेरिकन ग्रँडमास्टर हिकारू नाकामुरा विरोधातील अंतिम सामना अनिर्णित राखला. स्पर्धेत तो 14 पैकी 9 गुण मिळवण्यात यशस्वी ठरला. यासह त्याने ही स्पर्धा जिंकली आहे. त्यानंतर यावर्षीच्या अखेरीस डी. गुकेश आणि चीनचा ग्रँडमास्टर डिंग लिरेन यांच्यात सामना खेळवला जाणार आहे.

दरम्यान, 5 वेळा विश्वविजेता बनलेल्या महान बुद्धीबळपटू विश्वनाथन आनंद याने कॅन्डिडेट्स बुद्धीबळ स्पर्धा जिंकणाऱ्या गुकेशचे अभिनंदन केले आहे. विश्वनाथ आनंद याने एक्सवर गुकेशच्या अभिनंदनाची पोस्ट लिहिली आहे. यामध्ये “सर्वात युवा चॅलेंजर बनल्याबद्दल डी. गुकेशचं अभिनंदन. तू जे काही साध्य केले आहेस त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. कठीण प्रसंगी तू कसा खेळलास, अवघड प्रसंग कसे हाताळलेस ते पाहून मला तुझा अभिमान वाटतो. तू आता या खास क्षणाचा आनंद घे”, असे विश्वनाथ आनंद यांनी म्हटले.


हेही वाचा – PBKS vs GT : राहुल तेवतीयाची तुफानी खेळी; गुजरातचा 3 विकेट्सनी पंजाबवर विजय

Edited By – Vaibhav Patil

First Published on: April 22, 2024 10:28 AM
Exit mobile version