किदाम्बी श्रीकांतचा डेन्मार्क ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जपानच्या केंटो मोमोटाने पराभव केला. श्रीकांतला जपानच्या केंटो मोमोटाने १६-२१, १२-२१ असे पराभूत केले. त्यामुळे त्याचे ही स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले. मोमोटासमोर श्रीकांतचा नववा पराभव होता. तर श्रीकांतला मोमोटावर फक्त ३ विजय मिळवण्यात यश आले आहे.
असा झाला सामना
उपांत्य फेरीत किदाम्बी श्रीकांतला जपानच्या केंटो मोमोटाने १६-२१, १२-२१ असे पराभूत केले. या सामन्यातील पहिल्या सेटच्या मध्यंतराला मोमोटाकडे ११-१० अशी अवघ्या एका गुणाची आघाडी होती. यानंतर मोमोटाने आपली आघाडी १५-११ अशी वाढवली. अखेर मोमोटाने हा सेट २१-१६ असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये मोमोटाने चांगली सुरुवात केली. या सेटच्या मध्यंतरापर्यंत त्याच्याकडे ११-७ अशी आघाडी होती. मध्यंतरानंतर मोमोटाने अधिक आक्रमण करत १९-१२ अशी मोठी आघाडी मिळवली. त्याने पुढील दोन्ही गुण मिळवत हा सेट २१-१२ असा जिंकला. त्यामुळे त्याने स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
A fine run from the ?? World No 6⃣ @srikidambi that saw him defeat Chinese legend Lin Dan in the QF of the #DenmarkOpenSuper750 comes to an end after a 16-21, 12-21 SF loss against second seed @KentoMomotaFC.
Come back stronger! ??#IndiaontheRise pic.twitter.com/AflLixnVws— BAI Media (@BAI_Media) October 20, 2018