धोनी अजूनही दमदार कामगिरी करू शकेल!

धोनी अजूनही दमदार कामगिरी करू शकेल!

Watson-dhoni

भारताचा अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज महेंद्रसिंग धोनी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकानंतर एकही सामना खेळलेला नाही. मात्र, त्याने अजून निवृत्तीही घेतलेली नाही. भारतीय संघ व्यवस्थापन आणि निवड समिती युवा रिषभ पंतला जास्तीजास्त संधी देण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, त्याला सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयश आले आहे. त्यामुळे धोनीचे भारतीय संघात पुनरागमन होऊ शकेल, असे मत शेन वॉटसनने व्यक्त केले.

धोनी अजूनही दमदार कामगिरी करू शकेल असा मला विश्वास आहे. मात्र, निवृत्त व्हायचे की नाही, हा निर्णय त्यानेच घेतला पाहिजे. तो अजूनही चांगली हालचाल करतो, वेगाने धावतो आणि अप्रतिम यष्टिरक्षणही करतो. तो भविष्याबाबत जो निर्णय घेईल, तो योग्यच असेल, असे वॉटसन म्हणाला.

तसेच वॉटसनने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचेही कौतुक केले. त्याने भारतीय संघासाठी फारच उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तो फलंदाज म्हणूनही क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत सातत्याने धावा करत आहे. तो कर्णधार म्हणून घेत असलेल्या निर्णयांचा भारतीय संघावर सकारात्मक परिणाम होत आहे, असे वॉटसनने सांगितले.

First Published on: October 15, 2019 5:00 AM
Exit mobile version