धोनीला विंडीज, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० संघातून वगळले

धोनीला विंडीज, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० संघातून वगळले

महेंद्रसिंग धोनी

वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेच्या संघातून महेंद्रसिंग धोनीला वगळण्यात आले आहे. धोनीला मागील काही काळात वनडे क्रिकेटमध्ये चांगले प्रदर्शन करण्यात अपयश आले आहे. त्यामुळेच त्याला संघात न घेण्याचा निर्णय निवड समितीने घेतला आहे. त्याच्याजागी रिषभ पंत आणि दिनेश कार्तिक हे यष्टिरक्षणाची धुरा सांभाळतील. धोनीने भारतासाठी आतापर्यंत ९३ टी-२० सामने खेळले आहेत. ज्यात त्याने ३७.१७ च्या सरासरीने १४८७ धावा केल्या आहेत. तर त्याने मागील आयपीएलमध्येही चांगली कामगिरी केली होती. विंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे.

First Published on: October 26, 2018 11:16 PM
Exit mobile version