कर्णधार म्हणून सुरुवातीला धोनी गोलंदाजांवर नियंत्रण ठेवायचा!

कर्णधार म्हणून सुरुवातीला धोनी गोलंदाजांवर नियंत्रण ठेवायचा!

महेंद्रसिंग धोनी पहिल्यांदा २००७ मध्ये भारताचा कर्णधार झाला, तेव्हा तो गोलंदाजांवर नियंत्रण ठेवायचा. त्यानंतर हळूहळू करुन २०१३ पासून त्याने आपल्या गोलंदाजांवर विश्वास दाखवण्यास सुरुवात केली, असे विधान भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने केले. धोनीच्या नेतृत्वात भारताने २००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेला टी-२० विश्वचषक जिंकला होता. पठाणही या विश्वविजेत्या संघाचा सदस्य होता. त्यानंतर २०१३ मध्ये धोनी कर्णधार असतानाच भारताने चॅम्पियन्स लीग स्पर्धा जिंकली आणि या भारतीय संघातही पठाणचा समावेश होता. या दोन विश्वचषकांदरम्यान धोनीमध्ये कर्णधार म्हणून खूप बदल झाला होता असे पठाणला वाटते.

बैठक केवळ पाच मिनिटे चालायची

२००७ मध्ये धोनीची पहिल्यांदा भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड झाली. राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करणे ही खूप मानाची गोष्ट आहे. त्यामुळे इतकी मोठी जबाबदारी मिळाल्यानंतर कोणताही खेळाडू चांगली कामगिरी करण्यास उत्सुक असणार. हेच धोनीच्या बाबतीत घडले. त्यानंतर २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतही मी त्याच्या नेतृत्वात खेळलो. या दोन्ही स्पर्धांमध्ये आमच्या संघाची बैठक केवळ पाच मिनिटे चालायची, असे पठाण म्हणाला.

धोनीमध्ये हळूहळू बदल झाला

धोनीमध्ये कर्णधार म्हणून हळूहळू बदल झाला. २००७ मध्ये तो खूप उत्साही असायचा. त्यामुळे तो यष्टीरक्षकाच्या जागेवरुन गोलंदाजपर्यंत धावत यायचा आणि गोलंदाजाने कशी गोलंदाजी केली पाहिजे हे सांगायचा. त्याला गोलंदाजांवर नियंत्रण ठेवायला आवडायचे. परंतु, २०१३ पासून त्याने गोलंदाजांवर विश्वास दाखवण्यास सुरुवात केली. त्यांना हवी तशी गोलंदाजी करु दिली. २००७ मध्ये उत्साही असणारा धोनी २०१३ मध्ये फारच शांत आणि संयमी झाला होता, असेही पठाणने सांगितले.

First Published on: June 29, 2020 2:00 AM
Exit mobile version